Mahira Sharma: छोड्या पडद्यावरील स्टार अभिनेत्री माहिरी शर्मा गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. 'बिग बॉस १३' व्या सिझनमध्ये आल्यानंतर तर ती प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोहोचली होती. आता तिचं नाव क्रिकेटपटू मोहम्मद सिराजशी (Mohammed Siraj) जोडलं जातंय. हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचा दावा केला जातोय. अशातच आता माहिरा शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नुकतंच माहिरा पापाराझींसमोर पोझ देताना दिसून आली. यावेळी पापाराझींनी तिला "तुझा आवडता क्रिकेटपटू कोणता आहे? असं विचारलं. यावर पापाराझींच्या या प्रश्नावर तिनं हसत "पूर्ण इंडियन क्रिकेट टीम" असं उत्तर दिलं. यानंतर पापाराझींनी सिराज सिराज असं म्हणत तिला चिडवायला सुरुवात केली. पण, यावर तिनं कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण, नेटकऱ्यांनी मात्र या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत मजेदार कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं म्हटलं, "सिराजचे नाव ऐकल्यानंतर ती लाजली वाटली". तर दुसऱ्यानं लिहिलं, "प्यारी समझ गई". तर एकाने म्हटलं, "ती लाजतेय, कारण यामुळे आणखी चर्चा होईल आणि तिला प्रसिद्धी मिळेल", अशा अनेक कमेंट नेटिझन्सनी केल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी 'बिग बॉस १३' ची स्पर्धक माहिरा शर्मा आणि क्रिकेटपटू मोहम्मद सिराज डेटिंग करत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. यावर अभिनेत्री किंवा क्रिकेटपटूने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तथापि, माहिराच्या आईने टाईम्स नाऊशी बोलताना सर्व चर्चा फेटाळल्या होत्या.
माहिरा शर्मा ही मुळची जम्मू काश्मीरची आहे. तिने आतापर्यंत 'नागीन ३', 'कुंडली भाग्य', 'बेपनाह प्यार' अशा मालिकांमध्येही भूमिका केलेली आहे. माहिरा शर्माचा जन्म २५ नोव्हेंबर १९९७ रोजी झालेला आहे. उच्च शिक्षणासाठी ती जम्मू काश्मीरमधून मुंबई स्थायिक झाली. ती आतापर्यंत अनेक पंजाबी गाण्यांत दिसलेली आहे. तिच्या लेहंगा या गाण्याला विशेष प्रसिद्धी मिळालेली आहे. या गाण्याला यूट्यूबवर एक बिलियन व्ह्यूज मिळालेले आहेत.