Join us

Mahesh Babu Mother : सासूबाईंच्या निधनानंतर नम्रता शिरोडकरची भावुक पोस्ट, मिस यू नैनम्मा... म्हणत नातवंडही भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 16:47 IST

Mahesh Babu Mother : इंदिरा देवींना अखेरचा निरोप दिल्यानंतर आता महेशबाबू, महेशबाबूची पत्नी व अभिनेत्री नम्रता शिरोडकर आणि मुलगी सितारा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

साऊथ सुपरस्टार महेशबाबूची ( Mahesh Babu ) आई इंदिरा देवी यांचं काल  बुधवारी निधन झालं. हैदराबादेतील एआयजी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काल इंदिरा देवींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी महेशबाबूला अश्रू अनावर झालेत. महेशबाबूची लेक सितारा तर आजीच्या पार्थिवाला पाहून ढसाढसा रडली. इंदिरा देवींना अखेरचा निरोप दिल्यानंतर आता महेशबाबू, महेशबाबूची पत्नी व अभिनेत्री नम्रता शिरोडकर आणि मुलगी सितारा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

महेशबाबूने आईचा एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्याने फक्त हार्ट इमोजी शेअर केलेत. इंदिरा देवी यांनी बुधवारी (28 सप्टेंबर) पहाटे चार वाजता अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून इंदिरा देवी यांची प्रकृती बिघडली होती. काही दिवसांपूर्वी त्यांना हैदराबाद येथील एआयजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. इंदिरा देवी या सुपरस्टार कृष्णा  यांच्या पत्नी होत्या. महेश बाबू यांचे वडील आणि सुपरस्टार कृष्णा यांनी दुसरं लग्न केलं होतं. इंदिरा देवी या त्यांच्या पहिल्या पत्नी होत्या. कृष्णा यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर त्या एकट्याच राहत होत्या. महेश बाबू यांच्या अनेक कार्यक्रमात इंदिरा देवी आवर्जून उपस्थित असायच्या.

नम्रताने सासूबाईंच्या निधनानंतर शेअर केली पोस्ट

नम्रता शिरोडकर हिनेही सासूबाईंच्या निधनानंतर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. ‘आम्हाला तुमची खूप आठवण येईल. तुम्ही दिलेलं प्रेम आणि तुमच्या आठवणी नेहमी आमच्यासोबत असतील. मी तुमच्या पश्चात तुमच्या मुलावर, नातवंडांवर आणि कुटुंबावर प्रेमाचा वर्षाव करत राहिले. आई, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि ते तसंच कायम राहिल,’ असं नम्रताने पोस्टमध्ये लिहिलं आहे. सोबत सासूबाईंचा एक फोटोही शेअर केला आहे.

नातवंडांची पोस्ट

सिताराने आज्जीच्या निधनानंतर भावुक पोस्ट शेअर केली आहे. मला तुझी आठवण येईल नैनम्मा... काश, तू परत येऊ शकली असती..., असं तिने लिहिलं आहे. महेशबाबूचा मुलगा गौतम यांनेही आज्जीचा जुना फोटो शेअर केला आहे.

आज्जी मी सारखा तुझाच विचार करतोय, तुझ्याच आठवणी आहेत. तू नेहमी माझ्यासोबत असशील. मीस यू सो मच नैनम्मा..., असं गौतमने लिहिलं आहे.

टॅग्स :महेश बाबूनम्रता शिरोडकर