Join us

महाठग सुकेश चंद्रशेखर - जॅकलिन फर्नांडिसची प्रेम कहाणी रुपेरी पडद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 18:52 IST

200 कोटी रूपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी महाठग सुकेश चंद्रशेखर तिहार तुरुंगात आहे. या प्रकरणात गेल्या काही महिन्यांपासून अनेक खुलासे होत आहेत.

200 कोटी रूपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी महाठग सुकेश चंद्रशेखर तिहार तुरुंगात आहे. या प्रकरणात गेल्या काही महिन्यांपासून अनेक खुलासे होत आहेत. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसोबत सुकेशचे प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले होते. त्याने महागडे गिफ्ट देऊन तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. यात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससह नोरा फतेहीचा समावेश असल्याचे बोलले जाते. आता सुकेश आणि जॅकलिनची प्रेमकहाणी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 

सुकेश चंद्रशेखर स्वतः जॅकलिनसाठी चित्रपट काढणार असल्याची बातमी समोर आली होती, पण आता मात्र सुकेश नव्हे तर एक प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक सुकेश आणि जॅकलिनच्या या प्रेम कहाणी रुपेरी पडद्यावर साकारणार आहे. दिग्दर्शक आनंद कुमार यांनी तिहार जेलच्या जेलरशी भेट घेतली असल्याची नवीन अपडेट समोर आली आहे.तिहार जेलचे जेलर दीपक शर्मा यांच्या म्हणण्यानुसार सुकेशच्या आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी बरेच जण उत्सुक आहेत. यासाठी आनंद कुमार यांनी माहिती गोळा करण्यासाठी तिहार जेलचा एक दौरा केला होता. दीपक शर्मा यांनी स्वतः आनंद कुमार यांच्याबरोबरचा एक फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा चित्रपट २०२४ च्या अखेरीस किंवा २०२५ मध्ये रिलीज होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आनंद कुमार यांनी ‘जिला गाजियाबाद’, ‘देसी कट्टे’सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

टॅग्स :जॅकलिन फर्नांडिस