Join us
Daily Top 2Weekly Top 5

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेला मिळाला पुरस्कार, म्हणाला- या पुरस्काराच्या लायक मी आहे की नाही....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 18:00 IST

नुकताच गौरवला एका पुरस्काराने गौरवण्यात आलं. हा क्षण गौरवने चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील एक हरहुन्नरी कलाकार आणि ‘फिल्टर पाड्याचा बच्चन’ म्हणजे गौरव मोरे. सध्या गौऱ्या म्हणजे चाहत्यांचा लाडका कलाकार. त्याच्या अभिनयाचे असंख्य चाहते आहेत.‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतून त्यानं मालिकाविश्वात पदार्पण केलं. या मालिकेत तो विनोदी भूमिका करत होता. पण त्याला खरी ओळख मिळाली ती  महाराष्ट्राची हास्यजत्रामधून. यानंतर गौरवने कधीच मागे वळून पाहिले नाही.  गौरवाचं मराठी चित्रपट आणि मालिकेतील त्याचं काम पाहून हिंदी चित्रपटसृष्टीतही त्याला संधी मिळाली. संजू, कामयाब, झोया फॅक्टर या चित्रपटातील त्याच्या कामाची चांगली वाहवा झाली.

नुकताच गौरवला एका पुरस्काराने गौरवण्यात आलं. हा क्षण गौरवने चाहत्यांसोबत शेअर केलाय.आणि त्याला कॅप्शन दिलीये की, खरच मी हया पुरस्काराच्या लायक आहे की नाही अजुनही कळत नाहीये.सामाजिक क्षेत्रात स्वतःला झोकुन देणारयांसाठीचा हा पुरस्कार सोहळा आहे.आणि त्यांच्याच बरोबरीने आपल्यासारख्याला पण एवढा मोट्ठा मान आपण दिलात.खुप आभारी आहे.महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब यांच्याहस्ते हा पुरस्कार देन्यात आला. सोबत महाराष्टाचे ख्यातनाम गायक आनंद शिंदे,मिलिंद शिंदे आणि मधुर शिंदे उपस्थित होते.धर्मात्मा फाउंडेशन चे खुप खुप आभार मानतो.सर्व प्रेक्षकांचे आभार मानतो...असं कॅप्शन देत गौरवने त्याला भिमरत्न पुरस्कार मिळाल्याचं त्यानं सांगितंलय.

यानंतर गौरववर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होतोय... गौरव त्याच्या सोशल मीडियावर सध्या खूप एक्टिव्ह आहे. तो सोशल मीडियावर त्याचे फोटो व्हिडीओ तसेच सेटवरची मजामस्ती शेअर करत असतो.   

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकार