Join us

कुणाल गांजावालाच्या आवाजाची जादू मराठीत

By admin | Updated: July 9, 2016 02:28 IST

भिगे होठ तेरे.. या गाण्यातून आजही प्रेक्षकांच्या मनावर आपल्या आवाजाची जादू कायम ठेवणाऱ्या कुणाल गांजावाल यांचा आवाज आता रसिकांना मराठी चित्रपटातदेखील ऐकायला

भिगे होठ तेरे.. या गाण्यातून आजही प्रेक्षकांच्या मनावर आपल्या आवाजाची जादू कायम ठेवणाऱ्या कुणाल गांजावाल यांचा आवाज आता रसिकांना मराठी चित्रपटातदेखील ऐकायला मिळणार आहे. एका आगामी मराठी चित्रपटासाठी कुणाल गांजावाला यांनी एक रोमँटिक गाणे गायले आहे. ‘बोलना’ हे गाणं नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित झालं. कुणाल गांजावाला यांचे हे मराठी गाणे प्रेक्षकांना आवडत असून, त्याला अनेक हिट्स मिळत आहेत. बोलना हे रोमँटिक गाणं कुणाल गांजावाला आणि आनंदी जोशी यांनी गायलं आहे. या गाण्याचे बोल सचिन अंधारेनी लिहिले आहेत, तर अमितराजने हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. कुणाल गांजावालाच्या आवाजाची जादू या त्याच्या नवीन गाण्यातून प्रेक्षक वर्ग अनुभवू शकतो. आनंदी जोशीचा आवाज तर मनावर मोहिनी घालतो आणि अमितराज यांच्या संगीताचे प्रत्येक जण फॅन आहेत. आता हे गाणे पडद्यावर पाहायला कुणाल गांजावाले यांचे चाहते उत्सुक असतील यात काही शंकाच नाही.