Join us

"मी कोलमडून गेले आहे..." सरोज खान यांच्या निधनानंतर माधुरी दीक्षितचे भावूक ट्विट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 12:44 IST

सरोज यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक बड्या कलाकारांना आपल्या तालावर नाचवले.

प्रसिद्ध बॉलीवूड कोरिओग्राफर सरोज खान यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. सरोज यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक बड्या कलाकारांना आपल्या तालावर नाचवले. किंबहुना त्यांच्या तालावर नाचणे म्हणजे अनेकजण भाग्य समजायचे. या यादीमध्ये माधूरी, श्रीदेवी, ऐश्वर्या यासारख्या मोठमोठ्या नावांचा सामावेश होता. अर्थपूर्ण, दिलखेचक स्टेप्स आणि नृत्याविष्काराचा आदर्श असेच त्यांच्या कोरिओग्राफीचे वर्णन करावे लागेल. माधुरी दीक्षितने सरोज खान यांना ट्विटरवरुन श्रद्धांजली वाहिली आहे. 

माधुरीने ट्विटरवर लिहिले, माझ्या गुरु आणि मैत्रिण सरोज खान यांच्या निधनामुळे कोलमडून गेली आहे. मला नृत्यात परीपूर्ण केल्याबद्दल मी नेहमीच तुमची आभारी राहिन. जगाने आज एक प्रतिभावान व्यक्तिला गमावला आहे. मला तुमची नेहमीच आठवण येईल. मी त्यांच्या कुटुंबीयाबद्दल संवेदना व्यक्त करते. 

‘तेजाब’ चित्रपटातील एक दो तीन हे गाणे माहित नसणार व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. माधुरीला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवणा-या या गाण्याच्या स्टेप्स सरोज खान यांच्या क्रिएटिव्ह डोक्यातून निर्माण झालेल्या आहेत. पुढे ‘डान्सिंग क्वीन’ म्हणून माधुरी ओखळली जाऊ लागली ती याच गाण्यामुळे.

टॅग्स :माधुरी दिक्षितसरोज खान