Join us  

'धकधक गर्ल'चा लेक घालत होता भारती सिंहला हातपंख्याने वारा; अभिनेत्रीला सत्य समजलं अन्....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 6:20 PM

Bharti singh: कलाविश्वातील मोठं नाव म्हणून माधुरी दीक्षितकडे पाहिलं जातं. मात्र, तिच्या लेकाने चक्क भारती सिंहला वारा घातल्यामुळे या गोष्टीची करण जोहरच्या सेटवर बरीच चर्चा झाली.

छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेला कार्यक्रम म्हणजे 'डान्स दीवाने'. भारती सिंह (bharti singh) सूत्रसंचालन करत असलेल्या या शोमध्ये आतापर्यंत अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. यामध्येच अलिकडे 'धकधक गर्ल' अर्थात माधुरी दीक्षितने (madhuri dixit) हजेरी लावली होती. यावेळी भारतीने माधुरी दीक्षितच्या लेकासोबत घडलेला एक किस्सा सांगितला. करण जोहरच्या (karan johar) सेटवर चक्क माधुरीच्या लेकाने भारतीला वारा घातला होता. हा किस्सा ऐकून माधुरी सुद्धा थक्क झाली होती.

"मी करण जोहरसोबत एका सिनेमात काम करत होते. त्यावेळी तुमचा मुलगा (अरीन)करणला असिस्ट करत होता. सिनेमातला सीन संपल्यानंतर करण सरांनी अरीनला खुर्च्या आणायला सांगितलं. त्या खुर्चांवर मी आणि हर्ष बसलो, त्यानंतर ते दोघं (अरीन आणि अरहान)  दोघंही आम्हाला  हातपंख्याने वारा घालू लागले", असं भारती म्हणाली.

पुढे ती म्हणते, "त्यावेळी करण सर तिथे आले आणि भारती तू या दोङघांना भेटलीस का? असं विचारलं. हा माधुरी मॅमचा मुलगा आहे आणि तो दुसरा अरबाज सरांचा मुलगा अरहान आहे असं सांगितलं. हे ऐकल्यावर मी ताड्कन उठले आणि त्यांच्या हातातला पंखा काढून घेतला."

दरम्यान, अरीन आणि अरहान ज्या पद्धतीने काम करत होते ते पाहून तिला त्यांचा अभिमान वाटला. सुपरस्टार्सची मुलं असूनही यांनी शून्यातून सुरुवात केली आहे. शक्य असतं तर त्यांनी डायरेक्ट पडद्यावर काम करायला सुरुवात केली असती. मात्र, त्यांनी शून्यातून सुरुवात केली हे पाहून मला खूप अभिमान वाटला त्यांचा. मुळात त्यांचे पालक किती समजूतदार आहेत. त्या दिवशी मला सेटवर एक नवीन गोष्ट शिकायला मिळाली, असंही भारती यावेळी म्हणाली. 

टॅग्स :माधुरी दिक्षितभारती सिंगसेलिब्रिटीबॉलिवूडकरण जोहर