Join us

कुटुंबासह मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय माधुरी दीक्षित, पाहा तिचे खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 17:56 IST

Madhuri Dixit off to the Maldives for a holiday with her family: मालदीव्हज आणि समुद्र हे प्रत्येकाचं आकर्षण. कितीही वेळा इथं आलं तरी ते कमीच अशी पोस्ट तिने केली आहे. या सगळ्या फोटोंना सोशल मीडियावर कमेंट्स आणि लाइक्स मिळत आहेत. 

माधुरी दीक्षित-नेने... बॉलीवुडची धकधक गर्ल... तिचा डान्स, तिची अदा, तिचा अभिनय... तिच्या प्रत्येक गोष्टीवर रसिक फिदा. गेल्या अनेक वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीतील यशस्वी अभिनेत्री हे बिरुद मराठमोळ्या माधुरीने मोठ्या मानाने मिरवलं आहे. लग्नानंतर माधुरी आपल्या संसारात आणि मुलांमध्ये बिझी झाली. तरीही तिचे सिनेमावरील प्रेम काही कमी झालं नाही.

त्यामुळे लग्नानंतरही सिनेमा आणि विविध रियालिटी शोच्या माध्यमातून माधुरी रसिकांच्या भेटीला येत असते. सध्या विविध पार्ट्या, इव्हेंट्स आणि सोहळ्यांमध्येही माधुरीचं दर्शन रसिकांना होत असतं. माधुरीची एक झलक पाहण्यासाठी रसिक आतुर असतात. सध्या माधुरी कुटुंबासह मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. 

तिच्या इन्सटाग्राम अकाउंटवर तिने काही फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोत माधुरीने छानशी पोझ दिली आहे. यावेळी माधुरीने समुद्र सफरीचाही आनंद घेतला. तसंच सूर्यास्त पाहण्याचाही मोह ती आवरु शकली नाही. हे सगळे फोटो माधुरीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मालदीव्हज आणि समुद्र हे प्रत्येकाचं आकर्षण. कितीही वेळा इथं आलं तरी ते कमीच अशी पोस्ट तिने केली आहे. या सगळ्या फोटोंना सोशल मीडियावर कमेंट्स आणि लाइक्स मिळत आहेत. 

माधुरी दीक्षित आणि वहिदा रेहमान यांचा 'पान खाये सैंयाँ हमारो'वर दिलखेचक डान्स!, व्हिडीओ झाला व्हायरल

सध्या माधुरी सिनेमात झळकत नसली तरी  टेलिव्हिजनवरील डान्स रिएलिटी शो 'डान्स दिवाने ३' ची परीक्षक आहे. या शोमधील ती तिच्या वेगवेगळ्या लूकने चाहत्यांना भुरळ पाडताना दिसते. मात्र नुकतेच तिने या शोमध्ये आपल्या डान्समधील दिलखेचक अदांनी सर्वांना घायाळ केले आहे. डान्स दिवाने या शोच्या मंचावर नुकतेच ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी माधुरी दीक्षित यांनी त्यांच्यासोबत पान खाये सैंयाँ हमारो या गाण्यावर डान्स केला. या गाण्यावरील दोघांच्या अदा खूपच दिलखेचक होत्या. माधुरी दीक्षितने हा व्हिडीओ सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर केला आहे आणि या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. त्यांच्या या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

टॅग्स :माधुरी दिक्षित