Join us

लेकीच्या ‘त्या’ ड्रेसवर बोलल्या मधू चोप्रा!

By admin | Updated: July 15, 2017 02:24 IST

बर्लिन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट प्रियांका चोप्राच्या काहीशा मनस्तापाचे (?) कारण ठरली होती.

बर्लिन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट प्रियांका चोप्राच्या काहीशा मनस्तापाचे (?) कारण ठरली होती. या भेटीदरम्यान प्रियांकाने घातलेला तोकडा ड्रेस वादाचा विषय ठरला होता. यावरून प्रियांका सोशल मीडियावर ट्रोल झाली होती. प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनी या विषयावर मौन तोडले आहे. पंतप्रधानांच्या भेटीवेळी प्रियांकाचा ड्रेस व्यवस्थित होता, पूर्ण बाह्यांचे कपडे तिने घातले होते. प्रियांकाचे इतर कार्यक्रम आधीच ठरलेले असल्यामुळे तिला कपडे बदलायला वेळ मिळाला नाही. शिवाय ड्रेस बदलून साडी नेसण्यासाठीही ती त्यांच्याकडे वेळ मागू शकत नव्हती. शिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रोटोकॉल अधिकाऱ्यांना प्रियांकाच्या ड्रेससंदर्भात काहीच तक्रार नव्हती. आपल्या कपड्यांच्या बाबतीत प्रियांका नेहमीच सजग असते. औपचारिक, अनौपचारिक भेटी, रेड कार्पेट कार्यक्रमांसाठीही ती एक दिवसाआधी तिचे कपडे विचारपूर्वक निवडते. इतकेच नाही तर एअरपोर्टवरही तिच्या लूकबाबत विशेष काळजी घेते, असे मधू चोप्रा यांनी म्हटले आहे.