Join us

‘फुल और कांटे’ फेम मधूच्या लेकीला पाहिलंत का?, दिसायला आहे आई इतकीच सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 15:57 IST

मधू दोन सुंदर मुलींची आई आहे. तिच्या दोन्ही मुली सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात

‘फुल और कांटे’ हा सिनेमा पाहिला असेल तर या चित्रपटातील एक सुंदर चेहरा क्षणात तुमच्या डोळ्यांपुढे येईल. होय, अभिनेत्री मधू. तिची ओळख करून द्यायचीच झाली तर सुंदर चेहरा, गोड हास्य आणि सहज सुंदर अभिनय अशी करून देता येईल़. मधू गेल्या १२ वर्षांपासून मोठ्या पडद्यावरुन गायब आहे, मात्र आजही तिची जादू कायम आहे. सध्या मधु मोठी मुलगी अमेया चर्चेत आहे.  

रोजा चित्रपट तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला असं म्हणायला हरकत नाही. जेंटलमैन, यशवंत, दिलजले, एलान और जनता की अदालत सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. १९९९मध्ये मधुने आनंद शाह सोबत लग्नगाठ बांधली होती.त्यानंतर तिने मोजक्याच चित्रपटात काम करायचे ठरवले. आपल्या कुटुंबाला खास करून आपल्या मुलींना वेळ देण्यासाठी तिने हा निर्णय घेतला.

मधू दोन सुंदर मुलींची आई आहे. तिच्या दोन्ही मुली सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात. अमेया आणि किया असे मधुच्या मुलीचे नाव आहे. मधुची मुलगी अमेया सोशल मीडियावर चर्चेत आहे. अमेया दिसायला मधु इतकीच सुंदर आहे.  अमेयाचे फोटो सध्या चर्चेत आहेत. मधु आपल्या दोनही मुलींसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. चाहते त्यावर कमेंट करत त्यांच्या सौंदर्याचे कौतुक करत असतात.  

टॅग्स :मधू