Join us

मॅडम एक्स बनणार हुमा

By admin | Updated: August 7, 2014 23:08 IST

बॉलीवूडची नवोदित अभिनेत्री हुमा कुरैशी पडद्यावर मॅडम एक्सची भूमिका निभावणार आहे

बॉलीवूडची नवोदित अभिनेत्री हुमा कुरैशी पडद्यावर मॅडम एक्सची भूमिका निभावणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि तिगमांशू धुलिया एकत्र येऊन ‘मॅडम एक्स’ नावाचा चित्रपट बनवत आहेत. हा चित्रपट एका गुजराती पुस्तकावर आधारित आहे. चित्रपटात हुमा कुरैशी मुख्य भूमिकेत दिसेल. या चित्रपटात ती गँगस्टरच्या भूमिकेत आहे. तिगमांशू धुलिया म्हणाले की, ‘मी जेव्हा हुमाला ही कथा ऐकवली तेव्हा ती खूप रोमांचित झाली आणि लगेचच चित्रपटाला होकार दिला. चित्रपटाचे शूटिंग मेरठ आणि मुंबईत केले जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग कश्यप करणार आहे. यापूर्वी 1994 मध्ये दीपिक एस शिवदासानी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘मॅडम एक्स’ या चित्रपटात रेखा यांनी मुख्य भूमिका निभावली होती.’