Join us
Daily Top 2Weekly Top 5

M C Stan : '80 हजार के जूते' नंतर एम सी स्टॅनच्या टोपीची चर्चा, साध्या 'टोपी'ची किंमत ऐकून बसेल धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 12:48 IST

एमसी स्टॅनच्या बूटांनंतर आता त्याच्या टोपीची किंमत ऐकूनही अवाक व्हायला होईल. 

M C Stan : प्रसिद्ध रॅपर एमसी स्टॅन बिग बॉस १६ (Big Boss 16) मुळे चांगलाच चर्चेत असतो. '80 हजार के जूते' हा त्याचा डायलॉग खूप व्हायरल झाला होता. कधी त्याचे बूट, तर कधी त्याचा शर्ट तर कधी हटके बेल्ट यामुळे तो चर्चेत असतो. आता एमसी स्टॅनच्या टोपीची चर्चा जोर धरु लागली आहे. एमसी स्टॅनच्या बूटांनंतर आता त्याच्या टोपीची किंमत ऐकूनही अवाक व्हायला होईल. 

बिग बॉस १६ मधील एमसी स्टॅनचा एक फोटो व्हायरल झाला आहे. यात त्याच्या टोपीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या टोपीची किंमत किती असेल बरं असा प्रश्न सर्वांना पडला आहे. एमसी स्टॅनच्या साध्या टोपीची किंमतही अवाक करणारीच आहे. ही टोपी 'बॅलेंसियागा' (Balenciaga)  ब्रॅंडची आहे. त्याने एका एपिसोडमध्ये ही काळ्या रंगाची टोपी घातली होती. याची किंमत ३० हजारांपासून सुरु होते अशा चर्चा आहे. 

याचाच अर्थ एमसी स्टॅनच्या कोणत्याच गोष्टी साध्या नसतात. ८० हजार के जूते नंतर आता त्याच्या टोपीचीही अशीच चर्चा होणार दिसते आहे. 'बिग बॉस १६' मध्ये 'एमसी स्टॅन' हा ताकदीचा स्पर्धक आहे. गेल्या आठवड्यात 'एमसी स्टॅन' आणि 'शिव ठाकरे' हे दोघेही नॉमिनेट झाले आहेत. 'बिग बॉस १६' च्या फिनालेला दोनच आठवडे शिल्लक आहेत. त्यामुळे आता कोणता स्पर्धक यावेळी बाहेर पडतो याची उत्सुकता आहे. 

टॅग्स :बिग बॉसव्हायरल फोटोज्सोशल व्हायरलसोशल मीडिया