Join us  

घटस्फोटानंतर इमरान खानच्या जीवनात लव्हलेडीची एन्ट्री, विवाहित अभिनेत्रीच्या प्रेमात पडला अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 4:35 PM

Imran Khan :आमिर खानचा पुतण्या इमरान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. घटस्फोटानंतर अभिनेत्याच्या आयुष्यात एका लव्ह लेडीचा प्रवेश झाला आहे, ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान(Aamir Khan)चा पुतण्या बॉलिवूड अभिनेता इमरान खान (Imran Khan) बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यावरुन गायब आहे. अलीकडे इमरान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत होता. त्याची माजी पत्नी अवंतिकासोबतचा त्याचा घटस्फोट चर्चेत होता. मात्र घटस्फोटानंतर आता त्याच्या आयुष्यात एका लव्ह लेडीची एन्ट्री झाली आहे. काल रात्री कीर्ती खरबंदा यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत इमरान दिसला होता. यावेळी तो एकटा नसून एका खास व्यक्तीसोबत स्पॉट झाला होता. इमरान येथे त्याची कथित गर्लफ्रेंड साऊथ अभिनेत्री लेखा वॉशिंग्टनसोबत स्पॉट झाला होता.

दोघेही बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या येत आहेत. या दोघांनी 'मटरू की बिजली का मन डोला' या चित्रपटात एकत्र काम केले होते. काल रात्री दोघांना एकत्र पाहिल्यानंतर आता त्यांचे नाते पक्के झाल्याचे मानले जात आहे. लेखा वॉशिंग्टनचे लग्न झाले आहे. तर इमरानने २०११ मध्ये अवंतिकाशी लग्न केले आणि २०१९ मध्ये दोघे वेगळे झाले. या दोघांनाही एक मुलगी आहे, तिचे नाव इमारा आहे. इमारा तिची आई अवंतिकासोबत राहते.

इमरान खानची चित्रपट कारकीर्दइमरान खानच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, 'जाने तू या जाने' या पहिल्या चित्रपटातून त्याने प्रेक्षकांमध्ये स्वतःसाठी एक खास स्थान निर्माण केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. पण या चित्रपटानंतर इमरान खानने अनेक फ्लॉप चित्रपट दिले, त्यानंतर तो मोठ्या पडद्यावरून गायब झाला.

टॅग्स :इमरान खान