Join us

प्रेमाची परिभाषा सांगणारा 'लव्ह फॅक्टर'!

By admin | Updated: November 18, 2014 02:00 IST

ख-या प्रेमाचा शोध घेणारी आणि प्रेम म्हणजे त्याग याची जाणीव करून देणारी एक रोमँटिक कथा ‘लव्ह फॅक्टर’ प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे.

ख-या प्रेमाचा शोध घेणारी आणि प्रेम म्हणजे त्याग याची जाणीव करून देणारी एक रोमँटिक कथा ‘लव्ह फॅक्टर’ प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. प्रेमाची खरी परिभाषा सांगणारा हा सिनेमा आहे असे एका वाक्यात म्हणता येईल. मुक्ताई फिल्म प्रोडक्शनच्या मुकुंद सातव यांचा हा निर्माता म्हणून पहिलाच सिनेमा असून ‘ढोलकीच्या तालावर’ या सिनेमानंतर लेखक-दिग्दर्शक किशोर विभांडिक यांचा हा दुसरा सिनेमा आहे. आजची तरूण पिढी खऱ्या प्रेमाला पोरकी झाली आहे, त्याग म्हणजे प्रेम आणि प्रेम म्हणजे त्याग अशी खरी प्रेमाची व्याख्या सांगणारा हा सिनेमा आहे, शारीरिक आकर्षण, सौंदर्य या पलीकडे खरं प्रेम म्हणजे आज अभावानेच पाहायला मिळतं. अशाच विषयावर भाष्य करणारा ‘लव्ह फॅक्टर’ हा सिनेमा आहे.या सिनेमात अभिनेता राजेश शृंगारपुरे प्रथमच रोमँटिक भूमिकेत दिसणार असून त्यांच्यासोबत खुशबू तावडे, कुशल बद्रिके, हषर्दा भावसार, प्रतिभा भगत ह्या कलाकरांच्या ही महत्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या १२ डिसेंबरला ‘लव्ह फॅक्टर’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.