Join us  

पुन्हा बहरलं प्रेम...!; मराठी सिनेइंडस्ट्रीतील हे कलाकार दुसऱ्यांदा पडले प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 7:00 AM

Marathi Cineindustry: मराठी सिनेइंडस्ट्रीत असे बरेच कलाकार आहेत, ज्यांना पहिल्या प्रेमात अपयश आले आणि मग ते दुसऱ्यांदा प्रेमात पडले. त्यातील काही लग्न बंधनातही अडकले आहेत.

कलाकार म्हटलं की त्यांच्या अफेयर्स आणि ब्रेकअप्सच्या चर्चा ऐकायला मिळत असतात. मराठी सिनेइंडस्ट्रीत असे बरेच कलाकार आहेत, ज्यांना पहिल्या प्रेमात अपयश आले आणि मग ते दुसऱ्यांदा प्रेमात पडले. त्यातील काही लग्न बंधनातही अडकले आहेत. यात महेश मांजरेकरपासून शशांक केतकर, सिद्धार्थ चांदेकर या कलाकारांचा समावेश आहे.

महेश मांजरेकर-मेधा मांजरेकर (Mahesh Manjarekar- Medha Manjarekar)

अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नीचं नाव दीपा मेहता असून ती कॉश्च्युम डिझाइनर होती. लग्नाच्या काही वर्षांनंतर दोघे वेगळे झाले. त्यानंतर महेश मांजरेकर यांनी अभिनेत्री मेधा यांच्यासोबत लग्न केले. महेश मांजरेकर यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुले आहेत तर मेधा यांनासुद्धा पहिल्या पतीपासून दोन मुली आहेत.

शशांक केतकर (Shashank Ketkar)

'होणार सून मी या घरची' या मालिकेच्या सेटवर तेजश्री प्रधान व शशांक केतकर एकमेकांच्या प्रेमात पडले. २०१४ साली दोघांनी लग्नदेखील केले मात्र लग्नाच्या वर्षभरातच त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. नंतर शशांकने प्रियांका ढवळेशी लग्न केले.

शर्मिष्ठा राऊत (Sharmishta Raut)

बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने काही वर्षांपूर्वी अमेय निपाणकरशी लग्न केले होते. मात्र दोघांचे लग्न फार काळ टिकू शकले नाही. घटस्फोटानंतर शर्मिष्ठा राऊतने तेजस देसाईशी लग्न केले.

सुयश टिळक (Suyash Tilak)

अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री आयुषी भावे नुकतेच लग्न केले. याआधी सुयश अभिनेत्री अक्षया देवधर रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा होती.

सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकर (Siddharth Chandekar-Mitali Mayekar)

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले होते. मीडिया रिपोर्टनुसार, सिद्धार्थ चांदेकर बरीच वर्षे मुग्धा परांजपे हिला डेट करत होता. मात्र काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी ब्रेकअप केले. त्यानंतर सिद्धार्थने मिताली मयेकरला प्रपोझ केले आणि २४ जानेवारी, २०२१ ला ते दोघे लग्न बंधनात अडकले. 

गिरीश ओक (Girish Oak)

'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतून घराघरात पोहचलेले अभिनेते गिरीश ओक यांनी पद्मश्री पाठक यांच्याशी लग्न केले होते. या दोघांना गिरीजा ओक ही मुलगी आहे. घटस्फोटानंतर गिरीश यांनी पल्लवीशी दुसरे लग्न केले. गिरीश आणि पल्लवी यांना दुर्गा ही मुलगी आहे.

अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave)

अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने २०१४ साली वरुण वैटिकरशी लग्न केले होते. मात्र लग्नाच्या दोन वर्षांनंतर ते दोघे विभक्त झाले. आता अभिज्ञाने दुसऱ्यांदा मेहुल पैसोबत लग्नगाठ बांधली आहे.

रेशम टिपणीस (Resham Tipnis)

हिंदी टीव्ही अभिनेता संजीव सेठशी रेशम टिपणीसने १९९३ साली लग्नगाठ बांधली आणि २०१४ मध्ये त्या दोघांनी घटस्फोट घेतला. सध्या रेशम संदेश किर्तीकरला डेट करत असल्याचे बोलले जाते. हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचे म्हटले जाते.

मेघा धाडे (Megha Dhade)

'बिग बॉस मराठी' फेम मेघा धाडे लग्नापूर्वी गरोदर होती. आदित्य पावस्करशी लग्न करण्यापूर्वी मेघाने सिंगल मदर म्हणून जबाबदारी पार पाडली. आदित्यला त्याच्या पहिल्या पत्नीपासून एक मुलगा आहे.

संग्राम समेळ (Sangram Samel)

अभिनेता संग्राम समेळने २०१६ साली अभिनेत्री पल्लवी पाटीलशी लग्न केले होते. काही वर्षानंतर ते दोघे विभक्त झाले. त्यानंतर संग्रामने त्याची मैत्रीण आणि डान्सर श्रद्धा फाटकसोबत लग्न केले.

टॅग्स :महेश मांजरेकर मेधा मांजरेकरसुयश टिळकमेघा धाडेसंग्राम समेळरेशम टिपणीसगिरिश ओकसिद्धार्थ चांदेकरमिताली मयेकर