Join us

Lokmat Most Stylish Awards 2021: बोल्डनेसमुळे चर्चेत राहणारी सनी लिओनी मोस्ट स्टायलिश फॅशनिस्टा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 23:22 IST

पॉर्न इंडस्ट्रीला कायमच रामराम करुन बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे सनी लिओनी. एकेकाळी आपल्या बोल्डनेसमुळे चर्चेत राहणारी सनी आज तिच्या उत्तम अभिनयामुळे चर्चेत असते.

मुंबई: पॉर्न इंडस्ट्रीला कायमच रामराम करुन बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे सनी लिओनी. एकेकाळी आपल्या बोल्डनेसमुळे चर्चेत राहणारी सनी आज तिच्या उत्तम अभिनयामुळे चर्चेत असते. लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड सोहळ्यात सनीचा सन्मान करण्यात आला. मोस्ट स्टायलिश फॅशनिस्टा पुरस्कारानं तिला गौरवण्यात आलं.

भारतीय-कॅनेडियन असलेली सनी लिओनीनं अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी पॉर्नस्टार म्हणून काम केलं. त्यानंतर सनीनं 'जिस्म 2' बॉलिवूड पदार्पण केलं. आज सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते. बिग बॉसच्या 5 व्या सिझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती. याच कार्यक्रमामुळे ती जास्त प्रकाशझोतात आली.

टॅग्स :सनी लिओनीलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डस