Join us  

Bhaubeej 2022 : भाऊबीजेच्या दिवशी तुफान व्हायरल होतोय मराठी चित्रपटसृष्टीतील ‘या’ क्युट भावंडांचा फोटो, तुम्ही ओळखलंत?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 4:37 PM

Bhaubeej 2022 : भाऊबीजेच्या मुहूर्तावर अनेक मराठी सेलिब्रिटींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तूर्तास एका फोटोनं सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे.

आज भाऊबीज. भारतीय संस्कृतीचा अभिमान. बहीण भावाच्या पवित्र नात्याचा पवित्र सण. यादिवशी या दिवशी बहिण भावाच्या दीघार्युष्यासाठी प्रार्थना करते. सेलिब्रिटीही हा सण उत्साहात साजरा करतात. भाऊबीजेच्या मुहूर्तावर अनेक मराठी सेलिब्रिटींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तूर्तास एका फोटोनं सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे. होय, एका सेलिब्रिटी भाऊबहिणीचा बालपणीचा फोटो सध्या तुफान व्हायरल होतोय. या भाऊबहिणीच्या जोडीला तुम्ही ओळखलंत का?

अद्यापही तुम्ही या दोघांना ओळखलं नसेल तर आम्ही सांगतो. फोटोतील ही भाऊबहिण म्हणजे स्वानंदी बेर्डे (Swanandi Berde)आणि अभिनय बेर्डे (Abhinay Berde) आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांच्या दोन्ही मुलांचा हा बालपणीचा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. स्वानंदी ही अभिनयची एकुलती एक बहिणी. दोघांमध्येही मस्त बॉन्ड आहे. अनेकदा दोघंही सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करताना दिसतात.

अभिनयने मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये‘ती सध्या काय करते’ या चित्रपटामधून कारकिर्दीची सुरुवात केली.  सतिश राजवाडे ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटासाठी एका फ्रेश चेहऱ्याच्या शोधात होते. अभिनयच्या रुपाने त्यांना तो चेहरा सापडला. अभिनय प्रमाणे स्वानंदी देखील अभिनयक्षेत्रात कार्यरत आहे. स्वानंदीने ‘धनंजय माने इथंच राहतात’ या नाटकामधून  नाट्यक्षेत्रात पदार्पण केलं होतं. स्वानंदीचे  रिस्पेक्ट आणि  मन येड्यागत झालंया  हे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. स्वानंदी सोशल मीडियावर सक्रीय असून वरचेवर तिच्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असते. 

टॅग्स :अभिनय बेर्डेस्वानंदी बेर्डेलक्ष्मीकांत बेर्डेमराठी अभिनेता