Join us

लाओ मेरी चप्पल...; यामी गौतमला ‘राधे माँ’ म्हणणाऱ्या विक्रांत मेस्सीला कंगनाचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 11:56 IST

यामीने लग्नविधीचे काही फोटो शेअर केले आणि अनेक सेलिब्रिटींनी तिला शुभेच्छा दिल्यात. आयुष्यमान व विक्रांत मेस्सी यांनीही कमेंट्स केल्यात. पण या दोघांच्या कमेंट्स पाहून कंगनाचा पारा चढला.

ठळक मुद्देआयुष्यमान व विक्रांतने यामीच्या फोटोची अशी खिल्ली उडवलेली कंगनाला आवडली नाही. तिने लगेच या दोघांना सणसणीत उत्तर दिले.

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमने नुकतीच दिग्दर्शक आदित्य धरसोबत (Yami Gautam Aditya Dhar Wedding) लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  यामी आणि आदित्यचे लग्न तिच्या मूळ गावी म्हणजेच हिमाचल प्रदेशमध्ये झाले.  यामी पहाडी वधू झाल्याचं पाहून कंगना राणौत (Kangana Ranaut) जाम खूश झाली आणि सोबत अभिनेता विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) आणि आयुष्यमान खुराणावर (Ayushmann Khurrana)भडकली. आता का तर त्यासाठी तुम्हाला पुढची बातमी वाचावी लागणार.तर यामीने लग्नविधीचे काही फोटो शेअर केले आणि अनेक सेलिब्रिटींनी तिला शुभेच्छा दिल्यात. आयुष्यमान व विक्रांत मेस्सी यांनीही कमेंट्स केल्यात. पण या दोघांच्या कमेंट्स पाहून कंगनाचा पारा चढला. मग काय, या दोघांनाही कंगनाने चांगलेच सुनावले.

यामीने शेअर केलेल्या एका फोटोत तिने लाल रंगाची साडी परिधान केल्याचे दिसतेय. तिच्या हातात कलिरे आहेत. हा फोटो पाहताच आयुष्यमान खुराणाने यामीची खिल्ली उडवली. ‘पूरी जय माता दी वाली फिलींग आ रही है. आप दोनो ज्वालाजी गये थे? ’, अशी कमेंट त्याने केली.  अभिनेता विक्रांत मेस्सी यानेही यामीच्या फोटोवर काहीशी अशीच कमेंट केली. ‘राधे मॉं सारखी पवित्र आणि शुद्ध दिसत आहेस,’ अशा आशयाची कमेंट त्याने केली.

आयुष्यमान व विक्रांतने यामीच्या फोटोची अशी खिल्ली उडवलेली कंगनाला आवडली नाही. तिने लगेच या दोघांना सणसणीत उत्तर दिले.‘  हिमाचलमधील वधू सर्वात सुंदर दिसतात. देवीसारखचं त्यांच तेज दिव्य असतं,’ असे तिने आयुष्यमानला सुनावले.  अभिनेता विक्रांत मेस्सीच्या कमेंटवर उत्तर देताना मात्र कंगनाने त्याला चक्क झुरळ म्हणाली. ‘कुठून निघाला हा झुरळ, माझी चप्पल आणा,’ अशा शब्दांत तिने आपला संताप व्यक्त केला.  

टॅग्स :कंगना राणौतयामी गौतमविक्रांत मेसीआयुषमान खुराणा