Join us

कोरोनाचे शिकार झाले ललित मोदी, सुष्मिताच्या भावाने केली कमेंट; पण ती कुठे गायब आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 14:07 IST

Lalit Modi : ललित मोदी यांनी इन्स्टावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तो हॉस्पिटलमधील बेडवर दिसत आहे. तब्येत बिघडल्यामुळे त्याला ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे.

Lalit Modi : माजी आयपीएल अध्यक्ष ललित मोदी आणि सुष्मिता सेन (Sushmita Sen) यांच्या नात्याची खूप चर्चा झाली होती. पण आता ललित मोदी हे कोविड 19 आणि न्यूमोनियाचे शिकार झाले आहेत. ललित मोदी यांनी इन्स्टावर पोस्ट करत त्यांच्या तब्येतीबाबत सांगितलं आहे. ललित मोदी यांची पोस्ट बघून बरेच लोक त्यांच्यासाठी प्राथना करत आहेत. सुष्मिता सेनचा भाऊ ललित मोदी यानेही या पोस्टवर कमेंट केली आहे.

ललित मोदी यांनी इन्स्टावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तो हॉस्पिटलमधील बेडवर दिसत आहे. तब्येत बिघडल्यामुळे त्याला ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे. ललित मोदीच्या पोस्टवर अनेकांनी त्याच्यासाठी प्रार्थना करणाऱ्या पोस्ट केल्या आहेत. तसेच ललित मोदीच्या पोस्टवर सुष्मिता सेनाच्या भावानेही कमेंट केली आहे.

रिपोर्टनुसार, ललित मोदी मेक्सिकोमध्ये होते. त्यादरम्यान त्यांना कोरोनाचं इन्फेक्शन झालं होतं. आधी त्यांना वाटलं होतं की, इतका त्रास होणार नाही. पण नंतर त्याची तब्येत जास्त बिघडली. ललित मोदी यांनी सांगितलं की, दोन डॉक्टर आणि मुलांच्या मदतीने त्यांना अखेर लंडनला आणण्यात आलं'. त्यांनी पुढे लिहिलं की, 'दुर्दैवाने मला 24 तास ऑक्सिजन सपोर्टवर रहावं लागलं'. शेवटी त्यांनी त्यांच्या फॅन्सला धन्यवाद दिले. 

आता सुष्मिताचा भाऊ राजीव सेन याने फोटोंवर कमेंट केल्यानंवर अनेकांना सुष्मिताच्या कमेंटची वाट आहे. ललित मोदीसोबत कथित नातं असूनही सुष्मिता सेन यावर काहीच बोलली नाही. गेल्यावेळी ती फार ट्रोल झाली होती. 

टॅग्स :ललित मोदीसुश्मिता सेनकोरोना वायरस बातम्या