Join us

सिद्धार्थ मल्होत्राच्या आयुष्यात लेडी लव्हची एन्ट्री, दोन्ही कुटुंबाकडून ग्रीन सिंगल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 15:24 IST

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे समजते आहे.

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचं नाव कोणत्या ना कोणत्या अभिनेत्रीसोबत जोडलं गेलेलं ऐकायला मिळत असतं. काही दिवसांपूर्वी त्याचे नाव त्याची सहकलाकार व मैत्रीण तारा सुतारियासोबत जोडले गेलं होतं. या दोघांनी मरजावां चित्रपटात एकत्र काम केले होते. याशिवाय सिद्धार्थ मल्होत्राचं नाव कियारा अडवाणी व आलिया भटसोबत जोडलं गेलं आहे. कियाराने नेहमीच सिद्धार्थसोबतच्या अफेयरचे वृत्त नाकारले आहे. तर सिद्धार्थदेखील स्वतःला सिंगल म्हणवतो. पण, त्याचे कियारावर प्रेम असल्याचे समजते आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी यांची लव्हस्टोरी बऱ्याच कालावधीपासून सुरू आहे. बॉलिवूडची ही जोडी नवीन नात्याला नाव देण्यासाठी तयार आहेत. इतकंच नाही तर या दोघांच्या कुटुंबानेदेखील त्यांच्या नात्याला मंजूरी दिली आहे.

स्पॉटबॉय रिपोर्टनुसार, सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणीचे कुटुंबदेखील त्यांच्या नात्यात सहभागी झाले आहेत. सांगितलं जातंय की, नवीन वर्षांच्या निमित्ताने कियारा अडवाणीने तिच्या घरी डिनर पार्टीचं आयोजन केलं होतं. या डिनर पार्टीला सिद्धार्थ मल्होत्रा त्याच्या कुटुंबासोबत गेला होता. तर यावेळी कियाराचे कुटुंबपण उपस्थित होते. 

या फॅमिली डिनर डेटवर कियारा व सिद्धार्थच्या कुटुंबाने एकमेकांशी बातचीत केली. मजेशीर बाब ही आहे की या दोघांच्या प्रेमाला कुटुंबियांकडून मंजूरी देण्यात आली आहे.

त्यामुळे कदाचित या दोघांच्या चाहत्यांना लवकरच गुड न्यूज मिळू शकते.

टॅग्स :सिद्धार्थ मल्होत्राकियारा अडवाणी