Join us
Daily Top 2Weekly Top 5

Lady Boss! आलिया भटचे स्टनिंग फोटोशूट, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 16:39 IST

काही तासांपूर्वी आलियाने नव्या फोटोशूटचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केलेत. या फोटोतील आलियाचे स्टनिंग लूक चाहत्यांना घायाळ केल्याशिवाय राहणार नाही.

ठळक मुद्देआलिया भट लवकरच ‘सडक 2’ या चित्रपटात दिसणार आहे.

आलिया भट सध्या बॉलिवूडच्या सर्वाधिक बिझी अभिनेत्रींपैकी एक आहे. पण तरीही सोशल मीडियावर ती ब-यापैकी अ‍ॅक्टिव्ह असते. काही तासांपूर्वी आलियाने नव्या फोटोशूटचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केलेत. या फोटोतील आलियाचे स्टनिंग लूक चाहत्यांना घायाळ केल्याशिवाय राहणार नाही.या फोटोत आलिया ‘बॉस लूक’मध्ये दिसतेय. यात आलियाने मल्टीकलर ब्लेजर व रेड कलरची पँट कॅरी केली आहे.  हे फोटोशूट शेअर करण्यापूर्वी आलियाने तिच्या अंडरवॉटर फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता. 

आलिया भट लवकरच ‘सडक 2’ या चित्रपटात दिसणार आहे. यात आलियाशिवाय आदित्य राय कपूर, पूजा भट, संजय दत्त महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.  गेल्या काही दिवसांपासून आलिया भट तिच्या लव्हलाईफमुळे चर्चेत आहे.

आलिया आणि रणबीर कपूर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे मानले जात आहे. चर्चा खरी मानाल तर, या लग्नात  डिझायनर सब्यासाची मुखर्जी दोघांचे ड्रेस डिझाइन करणार आहेत.शेफ ऋतु डालमियाला केटरिंग अरेंजमेंटसाठी अप्रोच करण्यात आले आहे.

या कपलच्या लग्नाची चाहते मात्र मोठ्या आतुरतेने वाट पाहात आहेत. तूर्तास आलिया व रणबीरच्या लग्नाची कुठलीही आॅफफिशिअल घोषणा झालेली नाही. लवकर आलिया व रणबीर ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत अमिताभ बच्चन, नागार्जुन, डिंपल कपाडिया, मौनी राय महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. पुढील वर्षी हा चित्रपट रिलीज होणार आहे. 

टॅग्स :आलिया भट