Join us

कुणाल कपूर 'गोल्ड' मध्ये दिसणार अक्षयसोबत

By admin | Updated: March 23, 2017 17:57 IST

बॉलिवूड अभिनेता कुणाल कपूर आता वेगळी भूमिका साकारताना प्रेक्षकांना दिसणार आहे. खेळावर आधारित 'गोल्ड' हा चित्रपट येणार असून यामध्ये कुणाल कपूर याच्यासोबत

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - बॉलिवूड अभिनेता कुणाल कपूर आता वेगळी भूमिका साकारताना प्रेक्षकांना दिसणार आहे. खेळावर आधारित 'गोल्ड' हा चित्रपट येणार असून यामध्ये कुणाल कपूर याच्यासोबत अभिनेता अक्षय कुमार सुद्धा असणार आहे. 
आगामी 'गोल्ड' या चित्रपटाचे दिग्दर्शन रीमा कागती करणार आहेत. या चित्रपटाची कहानी भारतीय हॉकी टीमवर आधारित आहे. भारताने 1948 मध्ये ऑलिम्पिक पहिले पदक पटकावले होते. त्यावेळी भारतीय हॉकी टीमचे नेतृत्व बलबीर सिंह यांनी केले होते. अभिनेता अक्षय कुमार यामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे. दरम्यान, आगामी 'गोल्ड ' या चित्रपटाबाबत कुणाल कपूने ट्विट केले आहे. यामध्ये त्याने म्हटले आहे की, माझ्या आवडत्या अभिनेत्यासोबत आणि रीमा कागती यांच्यासोबत काम करण्यास मी उत्सुक आहे. तसेच, या चित्रपटाची पटकथा मजेदार आहे. 
दिग्दर्शक रीमा कागती यांचा गोल्ड हा तिसरा चित्रपट असून याआधी तलाश, हनीमून ट्रॅव्हल्स प्रा. लि. या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. तर, रंग दे बसंती, आजा नचले, बचना ऐ हसीनो, वेलकम टू सज्जनपूर, डॉन 2, डियर जिंदगी अशा अनेक चित्रपटांमधून भूमिका साकारल्या आहेत. त्याने 'रंग दे बसंती' या चित्रपटात साकारलेल्या व्यक्तिरेखेचे खूप कौतुक झाले होते.