‘द कपिल शर्मा शो’चा कालचा एपिसोड पाहुन सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. या एपिसोडमध्ये अभिनेता गोविंदाने हजेरी लावली. एपिसोड धम्माल रंगला, पण या एपिसोडमध्ये कृष्णा अभिषेकची अनुपस्थिती सर्वांना खटकली. मग काय, यावरून एक ना अनेक चर्चा रंगल्या.गोविंदा हा कृष्णा अभिषेकचा मामा आहे. पण गेल्या अनेक वर्षांपासून दोघांमध्ये मतभेद सुरु आहेत. तेही इतके टोकाचे की, भाचा मामापुढे यायला तयार नाही. पाहुणा म्हणून मामा शोमध्ये येणार हे कळताच कृष्णाने त्या एपिसोडमध्ये न दिसण्याचा निर्णय घेतला. कृष्णा अनेकदा मामा गोविंदाची नक्कल करताना दिसतो. मात्र दोघांमधील मतभेद दीर्घकाळापासून सुरु आहेत. अर्थात आता कृष्णाला हे मतभेद संपवायचे आहेत आणि खास म्हणजे, हे मतभेद संपवण्यासाठी कृष्णाला कपिलची मदत हवी आहे.
असे सुरु झाले होते भांडणकृष्णा व गोविंदा यांच्या वादाचे कारण ठरले होते एक ट्वीट. कृष्णाची पत्नी कश्मिरा शाहने एक ट्वीट केले होते. त्यात लोक पैशांसाठी नाचतात असा उल्लेख करण्यात आला होता. हे ट्वीट गोविंदासाठी केले असा गोविंदाच्या कुटुंबियांचा समज झाल्याने त्यांनी कृष्णाच्या कुटुंबियांशी सर्व संबंध तोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कश्मिराने हे ट्वीट नणंद बहीण आरती सिंगसाठी (कृष्णाची बहीण)टाकले होते असे स्पष्टीकरण कृष्णाने दिले होते.