Join us  

हाय गर्मी!! टायगर श्रॉफच्या बहिणीने शेअर केले कधी नव्हे इतके बोल्ड फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2021 11:22 AM

कृष्णा सोशल मीडियावर अ‍ॅॅॅक्टिव्ह आहे. ती नेहमीच आपल्या मित्रांसोबत पार्टी करताना दिसते. नेहमी स्टनिंग लूकमध्ये दिसणारी कृष्णा आपल्या भावाप्रमाणे दबंग आहे.

ठळक मुद्देफोटोमध्ये कृष्णाने काळ्या रंगाचे क्रॉप टॉप आणि काळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे. तिच्या या दोन्ही फोटोंची जोरदार चर्चा आहे.

जॅकी श्रॉफ  (Jackie Shroff) यांची लेक आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) याची बहिण कृष्णा श्रॉफ ( Krishna Shroff) बॉलिवूडपासून भलेही दूर आहे. पण चर्चेत कसे राहायचे, हे तिला चांगलेच कळते. सोशल मीडियावर स्वत:चे बोल्ड व ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ शेअर करून ती सतत चर्चेत असते. आता कृष्णाने एका मॅगझिनसाठी फोटोशूट केले आहे आणि त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. तिचे हे बोल्ड फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत.

फोटोमध्ये कृष्णाने काळ्या रंगाचे क्रॉप टॉप आणि काळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे. तिच्या या दोन्ही फोटोंची जोरदार चर्चा आहे. अनेक सेलिब्रिटींनी तिच्या या फोटोंवर कमेंट्स केल्या आहेत. टायगरची कथित गर्लफ्रेन्ड दिशा पाटनी हिनेही कृष्णाच्या या फोटोवर कमेंट केली आहे.

अर्थात काहींनी नेहमीप्रमाणे कृष्णाला ट्रोलही केले आहे. फोटोंमध्ये कृष्णाच्या जीन्सचे बटण उघडे आहे. हे पाहून अनेकांनी तिला नको ते सुनावले आहे.कृष्णा सोशल मीडियावर अ‍ॅॅॅक्टिव्ह आहे. ती नेहमीच आपल्या मित्रांसोबत पार्टी करताना दिसते. नेहमी स्टनिंग लूकमध्ये दिसणारी कृष्णा आपल्या भावाप्रमाणे दबंग आहे. टायगर वडिलांच्या पाउलावर पाऊल ठेवत फिल्म इंडस्ट्रीमध्ये आला. त्याने अ‍ॅॅक्शन स्टार म्हणून स्वत:ची वेगळी ओळख बनवली. पण जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा मात्र कायम पडद्यामागे राहणे पसंत करते.असे म्हणतात की, करण जोहरने 2012 मध्ये ‘स्टुडंट ऑफ इअर’साठी कृष्णाला ऑफर दिली होती. पण कृष्णाने ही ऑफर नाकारली आणि ही भूमिका नंतर आलिया भटच्या पदरात पडली. कृष्णाला टॅटू काढण्याचा छंद आहे.  शरीराच्या अनेक भागांवर तिने टॅटू गोंदवले आहेत.  

टॅग्स :कृष्णा श्रॉफटायगर श्रॉफजॅकी श्रॉफ