ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला न्यायालयाने अद्याप जामीन मंजूर केलेला नाही. आर्यनला आता 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी रिमांडवर पाठवण्यात आले आहे.दरम्यान आर्यनला अटक झाल्यानंतर शाहरुखला भेटण्यासाठी बॉलिवूडचे अनेक कलाकार मन्नतवर पोहचले होते.
बॉलिवूडचा दबंग सलमान खान मन्नतवर शाहरुखला भेटण्यासाठी पोहचला होता. सलमान खान मन्नतमध्ये सुमारे 40 मिनिटे थांबला आणि शाहरुख खानच्या या कठीण काळात सलमान त्याला आधार देताना दिसला. सलमान खानच्या आधी अभिनेता सुनील शेट्टी, अभिनेत्री पूजा भट्ट आणि सुचित्रा कृष्णमूर्ती देखील शाहरुख खानला भेटण्यासाठी आले होते.
बॉलिवूडचे कलाकार शाहरुखला नुसते भेटलेच नाहीतर आम्ही तुझ्या पाठीशी आहोत असे सांगणारे ट्विट देखली काही सेलिब्रेटींनी केले. पूजा भट्टने ट्विट करत लिहिले होते की, 'शाहरुख खान मी तुझ्या पाठीशी आहे. ही वेळही निघून जाईल. '
बॉलिवूडला उगाच लक्ष्य बनवण्यात येत आहे.तर काही सेलिब्रेटी शाहरुखला फोन कॉल करत विचारपुस करताना दिसत आहे. दीपिका पदुकोण, काजोल, राणी मुखर्जी, अनुष्का शर्मा यांनी शाहरुखला फोन केल्याची माहिती समोर आली आहे.
आर्यन खानच्या मुद्द्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "जेव्हा जेव्हा अशा प्रकारे गुन्हा समोर येतो तेव्हा बऱ्याच लोकांना ताब्यात घेतले जाते. असे गृहीत धरुया की, त्यांच्याकडून काही चुका झाल्या असतील.मला एवढेच म्हणायचे आहे की प्रक्रिया चालू आहे, त्या मुलाला श्वास घेऊ द्या''.
अखेर शाहरुखच्या टीमनेच सेलिब्रेटींना मन्नतवर येण्यास मनाई केल्याची माहिती समोर आली आहे. मन्नतबाहेर मीडिया असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.तसेच येणाऱ्या सेलिब्रेटींची सुरक्षेचा प्रश्न असल्याने सेलिब्रेटींना मन्नतवर येण्यास मनाई करण्यात आली आहे. 'इंडिया टुडे'ने दिलेल्या माहितीनुसार बॉलिवूडचे अनेक कलाकार शाहरुखच्या सपोर्टमध्ये आहेत.