Join us  

अखेर 'औरों में कहाँ दम था'ची रिलीज डेट लॉक, अजय-तब्बूची सुपरहिट जोडी पुन्हा धुमाकूळ घालणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 1:44 PM

अजय आणि तब्बू यांच्या 'औरों में कहाँ दम था' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

अभिनेता अजय देवगण आणि तब्बू यांची जोडी सध्या प्रचंड धुमाकूळ घालतेय.  दृश्यम पासून तब्बू आणि अजय देवगण हे बॉलिवूडमधले प्रत्येक सिनेमे सुपरहिट करत आहेत. दृश्यम,गोलमाल अगेन, दे दे प्यार दे दे, दृश्यम २, भोला सिनेमात अजय देवगण आणि तब्बू झळकले. भोला नंतर तब्बू आणि अजय देवगण यांचा नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  अजय आणि तब्बू यांच्या 'औरों में कहाँ दम था' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

अजय देवगण आणि तब्बूच्या जोडीने आतापर्यंत ९ चित्रपटांमध्ये आपली जादू दाखवली आहे. अजय आणि तब्बूचा शेवटचा चित्रपट 'दृश्यम २' होता. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. ही हिट जोडी आता १० व्या चित्रपटासाठी एकत्र आली आहे.  बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, नीरज पांडे दिग्दर्शित 'औरों में कहां दम था' यावर्षी ५ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. स्पेशल २६, बेबी, एम. एस. धोनी द अनटोल्ड स्टोरी,अ वेनस्डे याशिवाय स्पेशल ऑप्स अशा सिनेमा आणि वेबसिरीजचे दिग्दर्शन नीरज पांडेंनी केलंय.

रिलायन्स एंटरटेनमेंट निर्मित हा एक रोमँटिक थ्रिलर चित्रपट आहे. अजय देवगण आणि तब्बू हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध ऑन-स्क्रीन जोडपं आहेत. त्यांचा एकत्र पहिला चित्रपट १९९४ मध्ये प्रदर्शित झाला होता. अजय आणि तब्बूने विजयपथ (१९९४ ), हकीकत (१९९५ ), तक्षक (१९९९), दृश्यम (२०१५), फितूर (२०१६), गोलमाल अगेन (२०१७), दे दे प्यार दे (२०१९), दृश्यम २ (२०२२), भोला (२०२३) यामध्ये काम केलं आहे. 

टॅग्स :अजय देवगणसेलिब्रिटीबॉलिवूडतब्बूसिनेमा