Join us  

किंग खान शाहरुख खानला आवडली क्रिकेटपटूची हेअरस्टाइल, मॅनेजर पूजा ददलानीला म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 11:08 AM

शाहरुख खानला बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखलं जातं.

शाहरुख खानलाबॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखलं जातं. शाहरुख लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतो. शाहरुखची प्रत्येक स्टाइल त्याचे चाहते फॉलो करतात. मात्र, शाहरुख खान हा क्रिकेटपटू सुयशच्या हेअरस्टाइलवर फिदा झाला आहे. याचाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय. 

किंग खान शाहरुखची टीम KKR ही  IPL 2024 मध्ये जबरदस्त खेळतेय. शाहरुख प्रत्येक मॅचसाठी स्टेडियमवर हजर असतो. शाहरुख मॅचनंतर खेळाडूंना भेटतो आणि त्यांच्या गप्पा मारतो. मैदानावरील असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये शाहरुख 'कोलकाता नाइट रायडर्स' संघातील क्रिकेटपटू सुयश शर्मा याच्याशी गप्पा मारताना दिसून येत आहे. यावेळी शाहरुखला लेग स्पिनर सुयश शर्माची हेअरस्टाइल आवडली.  

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतं की, अभिनेता आणि कोलकाता संघाचा मालक असलेला शाहरुख खान हा क्रिकेटपटू सुयश शर्मासोबत बोलतोय. यावेळी शाहरुख सुयशच्या हेअरस्टाईलचं कौतुक करतो. 'कोणाच्या सांगण्यावरून तू ही हेअरस्टाईल केली आहेस', असं शाहरुख हा सुयशला विचारतो. यावर सुयश म्हणतो, 'मी स्वत:च केली आहे'. यावर शाहरुख त्याची मॅनेजर पूजा ददलानीला बोलावतो आणि अशीच हेअरस्टाइल हवीय असं तिला सांगतो.  

टॅग्स :शाहरुख खानसेलिब्रिटीबॉलिवूड