Join us  

Kim Kardashian च्या ६ वर्षाने मुलाने पाहिली तिची सेक्स टेप, अभिनेत्री म्हणाली - माझा आत्मा मेला आहे!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 3:05 PM

Kim Kardashian : २००७ मध्ये किम कर्दाशियांची एक सेक्स टेप इंटरनेटवर व्हायरल झाली होती. या व्हिडीओत ती तिचा एक्स बॉयफ्रेन्ड Ray J सोबत दिसली होती.

किम कर्दाशियां (Kim Kardashian) ही हॉलिवूडमधील सर्वात जास्त चर्चेत राहणारी स्टार आहे. किमला तिच्या रिअॅलिटी टीव्ही शोजसोबत वादग्रस्त सेक्स टेपसाठीही (Sex Tape) ओळखलं जातं. २००७ मध्ये किम कर्दाशियांची एक सेक्स टेप इंटरनेटवर व्हायरल झाली होती. या व्हिडीओत ती तिचा एक्स बॉयफ्रेन्ड Ray J सोबत दिसली होती. याच सेक्स टेपने किमला जगभरात फेमस केलं. पण यासाठी तिला खूपकाही ऐकावं सुद्धा लागलं. आता किमच्या सहा वर्षाचा मुलगा सेंट वेस्टने चुकून या सेक्स टेपची एक झलक पाहिली.

काही दिवसांपूर्वीच किमचा नवा शो The Kardashians लॉन्च झाला आहे. हा शो किम आणि तिच्या परिवाराबाबत आहे. शोच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये किमचा मुलगा सेंटला त्याच्या आयपॅडवर रोब्लॉक्स खेळताना बघण्यात आलं. या खेळादरम्यान सेंटने किमचा फेमस रडतानाचं मीम पाहिलं. या मीममध्ये किमच्या सेक्स टेपमधील काही सीन्स दिले गेले होते.

याबाबत सांगताना किम म्हणाली की, 'ते क्लिकबेट होतं ज्यावर देण्यात आलं होतं की, जर तुम्ही यावर क्लिक कराल तर एक नवीन सेक्स टेप येईल. जर माझा मुलगा थोडा आणखी मोठा असता आणि त्याला वाचता आलं असतं तर माझा जीवच गेला असता. पण मी आतून मेले आहे'.

सेक्स टेपमुळे वाद

२००७ मध्ये ही सेक्स टेप रिलीज झाल्यानंतर किम कर्दाशियांला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता. तिने विविड एंटरटेन्मेंट नावाच्या एका अॅडल्ट प्रॉडक्शन कंपनी विरोधात केस केली होती. किमचा आरोप हता की या कंपनीने तिची सेक्स टेप इंटरनेटवर टाकली. नंतर कंपनीने किमसोबत याप्रकरणी वाद मिटवला होता.

२०१९ मधील एका मुलाखतीत किमला विचारण्यात आलं होतं की, ती हे प्रकरण तिच्या मुलांना कसं समजावेल. तेव्हा किम म्हणाली होती की, 'मला वाटतं मी त्यांच्यासोबत इमानदारीने बोलणार आणि सत्य त्यांना सांगणार. मी फक्त हेच करू शकते'.

काही दिवसांपूर्वी Kevin Blatt नावाच्या सेक्स टेप ब्रोकरने दावा केला होता की, किम कर्दाशियांने या तिच्या या सेक्स टेपमधून २० मिलियन डॉलर्स म्हणजे १५२ कोटी रूपये कमाई केली होती. त्याने असंही सांगितलं होतं की, Ray J सोबतच्या या व्हिडीओच्या फायनल कटमधून काही सर्वात बोल्ड सीन्स डिलीट केले गेले होते. 

टॅग्स :किम कार्देशियनहॉलिवूड