Join us

कियारा अडवाणीची 'शेरशाह'मधील उत्कृष्ट कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 15:10 IST

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणीचा शेरशाह चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी अभिनीत शेरशाह १२ ऑगस्ट रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला आहे आणि तेव्हापासून सर्वत्र ह्या चित्रपटाच्या चर्चा गाजत आहेत. सिद्धार्थच्या भूमिकेपासून ते चित्रपटाचे दिग्दर्शन सगळ्यांनाच प्रेक्षक भरपूर दाद देताना दिसून येत आहेत. या सगळ्या बरोबरच कियाराचे ही विशेष कौतुक होताना दिसत आहे.

सिद्धार्थने कॅप्टन विक्रम बत्रा (पीव्हीसी) ची भूमिका साकारली आहे, तर कियाराने त्याच्या प्रेयसीची म्हणजेच डिंपलची व्यक्तिरेखा रेखाटली आहे. तिच्या पडद्यावरील मर्यादित वेळेमध्ये सुद्धा ती अत्यंत प्रामाणिकपणे आणि निर्दोषतेने काम करताना दिसते ,ज्यामुळे प्रेक्षक तिच्याशी कनेक्ट होतात. एका तरुण महाविद्यालयीन मुलीपासून ते  क्लायमॅक्समधील त्या भावनिक दृश्यात तिचे परिवर्तन अधिक हवे हवेसे वाटते.

आजच्या तरुण पिढीमध्ये कियारा खूपच प्रसिद्ध आहे. तिच्या एक एक फोटो ला सोशल मीडियावर खूपच लाइक आणि व्युज भेटतात.. तिची लोभस तितकीच हॉट व्यक्तिरेखेच्या प्रेमात तरुण युवक मत्रमुग्ध झालेले दिसून येतात आहेत.  सध्या बॉलिवुड मध्ये ती बऱ्याच मोठ्या  चित्रपटांच्या शूटिंग व्यस्त आहे.

लस्ट स्टोरीज, गुड न्यूज आणि गिल्टीसारख्या  वैविध्यपूर्ण यशस्वी भूमिका पार पडल्यानंतर, शेरशाह कियाराचा धर्मा प्रॉडक्शनबरोबरचा चौथा प्रोजेक्ट आहे. याचवरून अभिनेत्री आणि प्रॉडक्शन हाऊसला एकत्र अजून खूप मोठा पल्ला गाठातील ,असा अंदाज लावणे चुकीचे ठरणार नाही

टॅग्स :कियारा अडवाणीसिद्धार्थ मल्होत्रा