Join us  

KBC 13 : केबीसीत 7 कोटी रुपयांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंदर्भातील प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2021 2:19 PM

KBC 13 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंदर्भातील प्रश्न 7 कोटी रुपयांसाठी विचारण्यात आला होता.

ठळक मुद्देभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंदर्भातील प्रश्न 7 कोटी रुपयांसाठी विचारण्यात आला होता. डॉ. भीमराव आंबेडकर यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये सादर केलेल्या थेसीसचे शिर्षक काय होते? असा प्रश्न स्पर्धक हिमानीला विचारण्यात आला होता.

मुंबई : 'कौन बनेगा करोडपती 13' च्या सिझनमध्ये पहिला करोडपती स्पर्धक मिळाला आहे. केबीसीची लोकप्रियता प्रेक्षकांमध्ये दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या शोला खूप पसंती मिळत आहे. शो सुरू होऊन अवघे चारच दिवस झाले असताना अंध महिलेने 1 कोटी रुपये जिंकले आहेत. हिमानी बुंदेला असे या स्पर्धकाचे नाव आहे. 30 आणि 31 ऑगस्ट रोजी 1 कोटी रुपये जिंकणाऱ्या या स्पर्धकाचा एपिसोड ऑन एअर झाला. त्यामध्येस, 7 कोटी रुपयासाठी विचारलेल्या प्रश्नाचीही चर्चा रंगली आहे. 

केबीसीत दृष्टिहीन स्पर्धक हिमानी बुंदेलाने केबीसीच्या विविध टप्प्यातील उत्तरे देऊन एक कोटी रुपये जिंकले आहेत. नुकतेच हिमानीने तिच्या विजयाबद्दल सांगत जिंकलेल्या रकमेचा वापर कसा करणार आहे, हे सांगितले. ती म्हणाली, "बिग बींचा आवाज ऐकून मी स्तब्ध झाले. ते म्हणाले की, मी एक कोटी रुपये जिंकले आहेत. मी पूर्णपणे ब्लँक झाले होते. मी फक्त माझे दोन्ही हात वर केले आणि त्या क्षणाचा आनंद साजरा केला.", असे हिंमानीने म्हटले आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंदर्भातील प्रश्न 7 कोटी रुपयांसाठी विचारण्यात आला होता. डॉ. भीमराव आंबेडकर यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये सादर केलेल्या थेसीसचे शिर्षक काय होते? असा प्रश्न स्पर्धक हिमानीला विचारण्यात आला होता. हिमानाली या प्रश्नाचे उत्तर माहिती नसल्याने, तसेच 1 कोटी रुपये जिंकल्यामुळे तिने या प्रश्नावर गेम क्वीट केला. सुदैवाने हिमानीने दिलेले उत्तरही चुकीचे ठरले. मात्र, या प्रश्नाचे खरे उत्तर होते, 'द प्रॉब्लम ऑफ द रुपी'. 

हे 4 होते पर्याय

ए- द वान्ट्स एंड मीन्स ऑफ इंडियाबी- द प्रॉब्लम ऑफ द रूपीसी- नेशनल डिविडेंड ऑफ इंडियाडी- द लॉ एंड लॉयर्स 

हिमानीचे 10 वर्षांपासून प्रयत्न

हिमानीने असेही सांगितले की, ती गेल्या 10 वर्षांपासून या शोसाठी प्रयत्न करत आहे. ती म्हणाली, "मी केबीसीसाठी 14-15 वर्षे वयाची असल्यापासून प्रयत्न करत आहे. आता मी 25 वर्षांची आहे, मी अखेरचा प्रयत्न करत होते. मी क्विझ शोसाठी मेसेज पाठवत असे, पण ते नेहमी पेंडिंग दिसायचे." हिमानी पुढे म्हणाली, "मग मी नेहमी विचार करायचे की निवडीची प्रक्रिया काय असावी, ती मेसेजद्वारे आहे का? पण जेव्हा ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाली आणि नोंदणी केल्यानंतर मला मेसेज आला की, तुम्ही नोंदणी केली आहे. मी हॉट सीटवर कधी बसेन असा विचारही केला नव्हता."

हिमानीला आता काय करायचे आहे

हिमानी म्हणाली, "मी शोमध्ये जिंकलेल्या रकमेचा खुलासा करू शकत नाही. मला सर्वसमावेशक कोचिंग सुरू करायचे आहे. आमच्याकडे सर्वसमावेशक विद्यापीठ आहे, पण कोचिंग नाही ते स्पर्धा परीक्षेसाठी असेल जेथे अपंग आणि सामान्य मुले एकत्र अभ्यास करतील. आम्ही त्यांना यूपीएससी, सीपीसीएस साठी तयार करू. मी अंध मुलांना 'मानसिक गणित' शिकवण्यासाठीही पुढाकार घेतला. मला माझ्या वडिलांचा छोटा बिझनेस सेटल करायचा आहे, लॉकडाऊनदरम्यान त्याचे नुकसान झाले होते." 

टॅग्स :कौन बनेगा करोडपतीअमिताभ बच्चनडॉ. बाबासाहेब आंबेडकर