Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kaun Banega Crorepati : स्पर्धकाने चक्क अमिताभ यांच्याकडे केली ही तक्रार, उपस्थितांना आवरले नाही हसू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 14:56 IST

कौन बनेगा करोडपतीमध्ये हजेरी लावणाऱ्या शिवानी ढिंगरा यांना त्यांच्या पतीबाबत काय तक्रार आहे हे त्यांनी अमिताभ यांना सांगितले.

ठळक मुद्देशिवानी यांचे पती बँकेत कामाला असून ते दिवसभर ऑफिसमध्ये असतात आणि घरी आल्यानंतर ते मोबाईलमध्येच व्यग्र असतात अशी त्यांची त्यांच्या पतीच्या बाबतीत तक्रार होती.

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचे सगळेच सिझन चांगलेच गाजले आहेत. या कार्यक्रमाचा अकरावा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या सिझनला देखील प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमात नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रातील तसेच भारतातील विविध भागात राहाणारे लोक हजेरी लावत असतात. 

या कार्यक्रमातील स्पर्धक सात करोड रुपये जिंकण्याच्या आशेने या कार्यक्रमात हजेरी लावतात. त्यामुळे या कार्यक्रमात येणाऱ्या सगळ्या स्पर्धकांसाठी हा खेळ खूपच महत्त्वाचा असतो. पण हा खेळ सोडून कोणता स्पर्धक आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी कार्यक्रमात गप्पा मारताना दिसला असे आपल्याला कधी पाहायला मिळते का? हो, नुकत्याच घडलेल्या एका भागात असेच काहीसे एका स्पर्धकाच्या बाबतीत प्रेक्षकांना पाहायला मिळाले.

कौन बनेगा करोडपतीच्या हॉट सीटवर नुकतील शिवानी ढिंगरा यांनी हजेरी लावली. पण त्यांनी खेळ खेळण्याऐवजी चक्क पतीशी भांडायला सुरुवात केली. शिवानी यांनी या कार्यक्रमात येताना एक खास गोष्ट त्यांच्यासोबत आणली होती. त्यांनी एका कागदावर काही गोष्टी लिहून आणल्या होत्या आणि हा कागद त्यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांना दिला. त्यांनी या कागदावर त्यांची पतीबाबत काय काय तक्रार आहे हे या कागदावर लिहून आणले होते. ही यादी त्यांनी अमिताभ यांच्या हातात देऊन त्यांना याबाबत काहीतरी बोलायचे असल्याचे त्यांनी अमिताभ यांना सांगितले.  

तुम्हाला विश्वास बसणार नाही... पण शिवानी कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात त्यांच्या पतीसोबत चक्क भांडायला लागल्या. शिवानी यांचे पती बँकेत कामाला असून ते दिवसभर ऑफिसमध्ये असतात आणि घरी आल्यानंतर ते मोबाईलमध्येच व्यग्र असतात अशी त्यांची त्यांच्या पतीच्या बाबतीत तक्रार होती. एवढेच नव्हे तर त्यांचे पती त्यांना आजपर्यंत कधीच कँडल लाईट डिनरला घेऊन गेले नाहीत किंवा साधं गुलाबाचे फूलदेखील दिले नाही. शिवानी यांची पतीबाबतची ही तक्रार ऐकून उपस्थितांना देखील त्यांचे हसू आवरले नाही. 

टॅग्स :कौन बनेगा करोडपतीअमिताभ बच्चन