Join us

पैठणचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 15:00 IST

कैलाश कुंटेवाड यांनी लाईफलाईन न वापरता १० प्रश्नांची अचूक उत्तर दिली, मुलांना क्रिकेटर बनवण्याचे स्वप्न!

Kaun Banega Crorepati 17 : टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय क्विज शो 'कौन बनेगा करोडपती' नेहमीच चर्चेत असतो.  या शोच्या हॉट सीटवर बसण्याचे स्वप्न अनेकजण पाहतात. 'कौन बनेगा करोडपती'चा १७वा सीझन सध्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. नुकतंच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये शेतकऱ्यानं सहभाग घेतला होता. मराठवाड्यातील एका सामान्य शेतकऱ्याने आपल्या ज्ञानाच्या जोरावर ५० लाख रुपये जिंकले.

पैठणचे शेतकरी कैलाश रामभाऊ कुंटेवाड ( Paithan Farmer Kailash Rambhau Kuntewad in KBC) हे  मंगळवारच्या एपिसोडमध्ये हॉट सीटवर होते. त्यांनी १४ प्रश्नांची अचूक उत्तरे देत ५० लाख रुपये जिंकले. अमिताभ बच्चन यांनी खुलासा केला की, कैलाश रामभाऊ हे व्यवसायाने शेतकरी असून, ते महिन्याला साधारण तीन हजार रुपये कमावतात. त्यांना क्रिकेटमध्ये खूप रस आहे आणि त्यांच्या दोन मुलांना क्रिकेटर बनवण्याची त्यांची तीव्र इच्छा आहे.  कैलाश यांची जिंकलेल्या पैशातून मुलांना क्रिकेट अकादमीत पाठवण्याची योजना आहे. बिग बी यांनी कैलाश रामभाऊंचे विशेष कौतुक केले. त्यांनी कोणताही लाईफलाईन न वापरता १० प्रश्नांची अचूक उत्तरे दिली होती.

१ कोटीच्या प्रश्नावर खेळ सोडलाअमिताभ बच्चन यांनी कैलाश यांना १ कोटी किंमतीचा १५ वा प्रश्न विचारला. कैलाश यांनी लाफलाईन वापरली. पण, तरीही ते उत्तराबाबत अनिश्चित असल्याने त्यांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. कैलाश रामभाऊ कुंटेवाड ५० लाख रुपयांचे बक्षीस घेऊन 'KBC १७' मधून बाहेर पडले.

१ कोटीसाठी विचारलेला प्रश्न काय होता?

राष्ट्रपती भवनात असलेली विवियन फोर्ब्स यांनी बनवलेली "इन्व्हेन्शन ऑफ द प्रिंटिंग प्रेस" या शीर्षकाची पेंटिंग कोणाला दर्शवते?

पर्याय:A. योहान फुस्तB. विल्यम कॅक्सटनC. योहानेसD. रिचर्ड एम. हो

 योग्य उत्तर: B. विल्यम कॅक्सटन

English
हिंदी सारांश
Web Title : Paithan Farmer Wins ₹50 Lakh on KBC, Quits at ₹1 Crore Question

Web Summary : Kailash Rambhau Kuntewad, a farmer from Paithan, Maharashtra, won ₹50 lakh on 'Kaun Banega Crorepati'. He answered 14 questions correctly, using his winnings to support his children's cricket aspirations. He quit at the ₹1 crore question.
टॅग्स :अमिताभ बच्चनकौन बनेगा करोडपतीनांदेड