Join us

कॅटरिनाला कपूर कुटुंबाच्या व्हॉटस अॅप ग्रुपवरुन डच्चू

By admin | Updated: April 14, 2016 12:21 IST

रणबीर कपूरशी ब्रेक अप झाल्यानंतर कॅटिरना कैफला कपूर कुटुंबाच्या व्हॉटस अॅप ग्रुपमधून काढून टाकण्यात आल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १४ -  रणबीर कपूरशी ब्रेक अप झाल्यानंतर कॅटरिना कैफला कपूर कुटुंबाच्या व्हॉटस अॅप ग्रुपमधून काढून टाकण्यात आल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. रणबीरशी ब्रेकअप होण्याआधी कॅटरिना रणबीरसोबत कपूर कुटुंबाच्या अनेक कार्यक्रमाना हजर होती. तिने कपूर कुटुंबासोबत बांद्रयातील एका रेस्टॉरंटमध्ये डिनरही केले होते. 
 
रणबीर आयुष्यातून निघून गेल्यानंतर कपूर कुटुंबाने तिला व्हॉटस अॅप ग्रुपमधूनही डच्चू दिला आहे. टीओआयच्या वृत्तानुसार रणबीरची काकी रितू नंदा या ग्रुपची अॅडमिन असून, तिने कॅटरिनाला ग्रुपमधून काढून टाकले. 
 
कॅटरिनाची एक्झिट झाल्यानंतर रणबीरचे वडिल ऋषी कपूर यांचा या ग्रुपममध्ये समावेश झाला आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात रणबीर-कॅटरिनामध्ये ब्रेकअप झाले. त्यानंतर रणबीरने कॅटरीनासोबत ज्या घरात रहात होता ते घर सोडले.