Join us

कॅटरिना कैफच्या डुप्लिकेटला आपण पाहिले का ?, पाहताच तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 11:52 IST

अलीना ही मुंबईत राहते. सध्या तिची लुक्सला पाहून सारेच तिला कॅटरिना कैफ सारखी दिसत असल्यामुळे तिला खूप सारे लाईक्स आणि कमेंट्स देत असल्याचे पाहायला मिळत आहे.

जगात सेम टू सेम दिसणा-या सात व्यक्ती असतात असं म्हटलं जातं. सेलिब्रिटींचे तर अनेक डुप्लिकेट आपण पाहिले आहेत. बिग बी अमिताभ बच्चन, शाहरुख, अनिल कपूर, देवानंद अशा एक ना अनेक गाजलेल्या कलाकारांचे सेम टू सेम भासावे असे डुप्लिकेट आहेत.  यांच्या पाठोपाठ मध्यंतरी तर अनुष्का शर्मा, जॅकलिन यांच्याही  लूक अ लाईक समोर आली होती.  

आता याच यादीत भर टाकण्यासाठी कॅटरिना कैफचीही डुप्लिकेट समोर आली आहे. टिक टॉक सेंसेशन आणि  फॅशन ब्लॉगर अलीना रायही हुबेहुब कॅटरिना कैफ सारखी दिसते. अलीना ही मुंबईत राहते. सध्या तिची लुक्सला पाहून सारेच तिला कॅटरिना कैफ सारखी दिसत असल्यामुळे तिला खूप सारे लाईक्स आणि कमेंट्स देत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

कॅटरिना कैफचीही डुप्लिकेट म्हणून सोशल मीडियावर सध्या अलीना धुमाकुळ घातल्याचे पाहायला मिळतंय. इन्स्टाग्रामवर नजर टाकल्यास 32 हजाराहून अधिक फॉलोव्हर्स आहेत.इतकेच नव्हे तर खुद्द कॅटरिनाचे फॅन्स अलीनाचे फोटो कॅटरिनाच्या फोटोसह कोलाज करून शेअर करत असल्याचे पाहायला मिळत आहे. हुबेहुब कॅटरिना सारखी दिसत असल्यामुळे अलीन सध्या टॉक ऑफ टाउन बनली आहे.

 

तिचे फोटो पाहताच काही जण चक्क कॅटरिना समजूनच कमेंट करत आहेत तर काही सिंग इज किंग वाली कॅटरिना अशा कमेंटस देत आहेत. तर एका युजरने तर भन्नाट कमेंट करत म्हटले आहे की, ''तुझा फोटो पाहून आता सलमानने तुझा विचार करण्यास हरकत नाही''. सध्या सोशल मीडियावर अलिनाचा बोलबाला पाहता भविष्यात कॅटरिना कैफची डुप्लिकेट म्हणून मिळालेले बड्या बॅनर्सचे सिनेमा मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको.

कटरिनाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तर, कटरिना कैफ व रणबीर कपूर लवकरच एकत्र झळकणार आहेत. यांच्या ब्रेकअपला जवळपास तीन वर्षे झाले आहेत आणि आता ते दोघे एकत्र काम करताना पाहायला मिळणार म्हटल्यावर पुन्हा या दोघांची केमिस्ट्री रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.  मात्र कोणत्या चित्रपटात नाही तर मोबाईल फोनच्या जाहिरातीत ते दोघे झळकणार आहेत. या जाहिरातीत या दोघांसोबत बादशाहदेखील पहायला मिळणार आहेत.

टॅग्स :कतरिना कैफ