Join us

14 वेळा कश्मीरा शाहची प्रेग्नन्सी फेल, सलमानच्या सल्ल्याने उचलले हे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2018 16:02 IST

कॉमोडियन कृष्णा अभिषेक आणि त्याची पत्नी कश्मीरा शाह या जोडीला एक वर्षाआधी सरोगसीच्या माध्यामातून जुळी मुलं झालीत. अशात आता कश्मीराने एक मुलगीही हवी असल्याचं बोलून दाखवलं आहे.

मुंबई : कॉमोडियन कृष्णा अभिषेक आणि त्याची पत्नी कश्मीरा शाह या जोडीला एक वर्षाआधी सरोगसीच्या माध्यामातून जुळी मुलं झालीत. अशात आता कश्मीराने एक मुलगीही हवी असल्याचं बोलून दाखवलं आहे. नुकतीच तिने तिच्या प्रेग्नन्सीच्या अडचणींबाबत एका मुलाखतीत माहिती दिली.

कश्मीराने या मुलाखतीत खुलासा केला की, तिने 14 वेळा प्रेग्नंट राहण्याचा प्रयत्न केला आणि 14 वेळाही ती अपयशी ठरली. इतकेच नाहीतर तिने हेही सांगितले की, मुलांसाठी सरोगसीची मदत घेण्याचा सल्ला तिला सलमान खानने दिला होता. कश्मीरा म्हणाली की, फॅमिली प्लॅनिंगसाठी ती परीवारापासून दूर गेली होती. 

2012 मध्ये कृष्णासोबत लग्न केलेल्या कश्मीराने सांगितले की, मी बाळ होत नसल्याने त्या काळात फारच अडचणीतून गेले. हा काळ माझ्यासाठी खूप कठिण होता. याचा माझ्या आरोग्यावरही परीणाम झाला होता. नंतर मुलांसाठी तिने आयव्हीएफची इंजेक्शनचाही आधार घेतला. पण तरीही काही फायदा झाला नाही. 

कश्मीराने सांगितले की, या काळात माझं वजन खूप वाढलं होतं. अनेक अडचणींचा सामना मला करावा लागला होता. पण मी हिंमत हरले नाही. मी त्या सरोगेट आईचे मनापासून आभार मानते की, त्यांनी माझ्या मुलांना जन्म दिला.

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटी