Join us

राजा हिंदुस्तानीमधील तो किसिंग सीन चित्रीत करताना थरथर कापत होती करिश्मा कपूर, अभिनेत्रीने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 10:17 IST

Karisma Kapoor :हा सिनेमा त्या काळात बराच हिट झाला. पण यातील किसिंग सीनची बरीच चर्चा झाली होती.

करिश्मा कपूर सध्या रुपेरी पडदयापासून दूर असली तरी आजही तिचे लाखों चाहते आहेत. करिश्मा आज आपला ४८वा वाढदिवस साजरा करते ाहे. करिश्मा कपूर हिचा जन्म 25 जून 1974 साली कपूर खानदानात झाला. करिश्मा कपूरने 1991 मध्ये प्रेम कैदी सिनेमापासून करिअरला सुरुवात केली. करिश्मा कपूरचा दुसरा सिनेमा 'पोलिस ऑफिसर' हा होता. दिग्दर्शक डेविड धवनच्या राजा बाबू, अंदाज, कुली नं 1, जुड़वा, हिरो नं. 1, बीवी नं 1, हसीना मान जाएगी, दुल्हन हम ले जाएंगे, चल मेरे भाई यांसारख्या सिनेमामध्ये करिश्मा कपूरने भूमिका साकरल्या आहेत. पण सिनेमा १९९६ साली आलेल्या राजा हिंदुस्तानी या सिनेमाने तिला नवी ओळख मिळवून दिली.  हा सिनेमा त्या काळात बराच हिट झाला. यातील एका किसिंग सीनमुळे सिनेमा बराच चर्चेत आला होता. पण हा किसिंग सीन देताना या सीनचे  करिश्मा अक्षरशः कापत होती.

राजा हिंदुस्तानी चित्रपटातील हा सीन आमिर खान आणि करिश्मा कपूर यांच्यावर चित्रीत करण्यात आला होता. या सीनचे चित्रीकरण सुरू असताना करिश्मा अक्षरशः कापत होती असे तिने एका मुलाखतीच्या दरम्यान सांगितले होते. करिश्माने सांगितले होते की, या सीनच्या चित्रीकरणाला आम्हाला तीन दिवस लागले होते. चित्रीकरण फेब्रुवारीत उटीमध्ये झाले होते. त्याकाळात तिथे प्रचंड थंडी असते. थंडीने अक्षरशः मी कापत होते. या सीनचे चित्रीकरण कधी संपेन असे मला झाले होते. कारण प्रचंड थंडी असली तरी आम्ही थंड पाण्यात भिजून या दृश्याचे चित्रीकरण करत होतो. सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आम्ही सीनसाठी चित्रीकरण करत होतो.

राजा हिंदुस्तानीमधील हा किसिंग सीन जवळजवळ एक मिनिटांचा होता. आताच्या चित्रपटात आपल्याला इतक्या कालावधीचा किसिंग सीन पाहायला मिळतो. पण त्या काळासाठी हा सीन अतिशय बोल्ड मानला गेला होता. राज हिंदुस्तानी या चित्रपटाला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूपच चांगली कमाई केली होती. आमिर खान आणि करिश्मा कपूर यांच्या अभिनयाचे तर सगळ्यांनी कौतुक केले होते. या चित्रपटासाठी त्या दोघांना पुरस्कार देखील मिळाला होता. या चित्रपटात त्या दोघांशिवाय सुरेश ऑबेरॉय, अर्चना पुरण सिंग, फरिदा जलाल, जॉनी लिव्हर यांच्या मुख्य भूमिका होत्या.

टॅग्स :करिश्मा शर्माआमिर खान