Join us

करिनाने हृतिकमुळे सोडला ‘शुद्धी’

By admin | Updated: August 7, 2014 23:06 IST

करण जोहरचा ‘शुद्धी’ हा चित्रपट हृतिक रोशनमुळे सोडल्याचे कारण करिना कपूरने दिले आहे.

करण जोहरचा ‘शुद्धी’ हा चित्रपट हृतिक रोशनमुळे सोडल्याचे कारण करिना कपूरने दिले आहे. करणच्या या महत्त्वाकांक्षी चित्रपटासाठी हृतिक आणि करिनाची निवड करण्यात आली. ती म्हणाली, ‘मी हा चित्रपट स्वीकारला, कारण मला हृतिकसोबत काम करायचे होते. हृतिकने सोडल्याने हा चित्रपट करण्यात काहीच अर्थ नव्हता.’ या चित्रपटासाठी आता सलमान खानची निवड केली आहे.