Join us
Daily Top 2Weekly Top 5

करिना कपूरला मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज, दिसली बाळाची झलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 15:39 IST

करिनाने रविवारी गोंडस मुलाला जन्म दिला. करिनाला आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

ठळक मुद्देफोटोग्राफर्सची नजर चुकवत सैफ आणि करिना यांनी रुग्णालयातून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सैफ गाडी चालवत होता तर पुढच्या सीटवर तैमुर बसला होता.

करिना कपूर आणि सैफ अली खान यांचा मोठा मुलगा तैमुर आता पाच वर्षांचा झाला आहे. तैमुर जन्मल्यानंतर घरी जात असताना सैफ आणि करिनाने त्याला फोटोग्राफर्सच्या समोर आले होते आणि त्यांनी त्यांच्या छोट्याशा बाळाचे फोटो काढण्याची परवानगी देखील फोटोग्राफर्सना दिली होती. पण तैमुरसोबत केलेली ही गोष्ट करिना आणि सैफने त्यांच्या दुसऱ्या बाळासोबत केलेली नाही. त्यामुळे करिना आणि सैफच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

करिनाने रविवारी गोंडस मुलाला जन्म दिला. करिनाला आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. करिना रुग्णालयातून बाहेर पडताना फोटोग्राफर्सना बाळाचे फोटो काढून देईन असे सगळ्यांना वाटले होते. पण करिना आणि सैफने असे काहीही न करता बाळाला गाडीत बसवले. बाळाचा चेहरा कपड्याने झाकलेला असल्याने कोणालाच सैफ आणि करिनाच्या या चिमुकल्याचा चेहरा दिसला नाही.

फोटोग्राफर्सची नजर चुकवत सैफ आणि करिना यांनी रुग्णालयातून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सैफ गाडी चालवत होता तर पुढच्या सीटवर तैमुर बसला होता. मागे करिना आणि बाळाला सांभाळणारी नॅनी बसली होती तर नॅनीच्या हातात चिमुकले बाळ होते.  

करिना आणि सैफला बाळ झाल्यापासून त्यांचे बाळ कसे दिसते याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागलेली आहे. पण करिना आणि सैफने रुग्णालयातून घरी जाताना बाळाची झलक दाखवलेली नसल्याने त्यांची निराशा झाली आहे. पण करिना आणि सैफचे बाळ कसे दिसते हे नुकतेच करिनाचे वडील अभिनेते रणधीर कपूर यांनी सांगितले होते. रणधीर यांनी टाईम्स ग्रुपशी बोलताना सांगितले होते की, सगळीच बाळं सारखीच दिसतात. त्यामुळे बाळ कोणासारखे दिसते हे मला सांगता येणार नाही. पण सगळ्यांचे म्हणणे आहे की, बाळ अगदी त्याच्या मोठ्या भावासारखे म्हणजेच तैमुर सारखे दिसते. छोट्या बाळाच्या आगमनामुळे तैमुर प्रचंड खूश झाला आहे.

टॅग्स :करिना कपूरसैफ अली खान तैमुर