Join us  

Video: करीना कपूरला सुशांतवर केलेली कमेंट पडली महागात, जुना व्हिडिओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 12:09 PM

करीना कपूरचा जुना एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत तिने सुशांत सिंग राजपूतवर निशाणा साधल्याचे पहायला मिळत आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर अनेकजण बॉलिवूडच्या घराणेशाहीवर टीका करत आहे, काहींनी या प्रकरणाची थेट कोर्टात तक्रार नोंदवली आहे, करण जोहर, सलमान खान, आलिया भट्टसारख्या कलाकारांना नेटीझन्सकडून ट्रोल करण्यात येत आहे.त्यानंतर सोशल मीडियावर चाहते त्याच्या आठवणीमध्ये फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसत आहेत. त्यात आता बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरचा एक जुना व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तिने अप्रत्यक्षपणे सुशांत सिंग राजपूतवर निशाणा साधला असल्याचे म्हटले जात आहे.

करीना कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ ‘स्टोरी नाइट २’ या शोमधील आहे. व्हिडिओमध्ये करीना तिची मैत्रीण अमृता अरोरासोबत दिसत आहे. अमृता करीनाला काही प्रश्न विचारताना दिसत आहे. दरम्यान तिला ‘तू सारा अली खानला डेटिंगसंबंधी कोणता सल्ला देऊ इच्छितेस’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. 

अमृताच्या या प्रश्नवार करीनाने तिला आपल्या पहिल्या हीरोला कधीच डेट करु नकोस असे म्हटले होते. त्यानंतर ती हसू लागते. पण आता सोशल मीडियावर तिला या जुन्या व्हिडिओवरून ट्रोल करण्यात येत आहे.

अभिनेत्री सारा अली खाननेकेदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात सारासोबत अभिनेता सुशांत सिंग राजपूत मुख्य भूमिकेत होता. त्यामुळे करीनाने अप्रत्यक्षपणे सुशांतवर निशाणा साधले असल्याचे बोलत करीनाला ट्रोल करण्यात आले आहे.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतकरिना कपूरअमृता अरोरासारा अली खानकेदारनाथ