Join us

करिना कपूरला ६ कोटींची आॅफर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2017 01:40 IST

करिना कपूर सध्या तिच्या जुन्या फिगरमध्ये परतण्यासाठी मेहनत घेताना दिसतेय. रिया कपूरच्या ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटात करिना दिसणार

करिना कपूर सध्या तिच्या जुन्या फिगरमध्ये परतण्यासाठी मेहनत घेताना दिसतेय. रिया कपूरच्या ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटात करिना दिसणार असल्याचे म्हटले जातेय. पण, याबद्दल नाही तर आम्ही एक वेगळीच बातमी तुम्हाला देणार आहोत. होय, करिनाला म्हणे, एक महत्त्वपूर्ण भूमिका आॅफर झाली आहे. खास करिनाला समोर ठेवून ही भूमिका लिहिली गेली आहे आणि या चित्रपटासाठी करिनाला तब्बल ६ कोटी रुपयांचे मानधन मिळणार असल्याचीही खबर आहे. अद्याप करिनाने हा चित्रपट साईन केला वा नाही, हे स्पष्ट झालेले नाही. पण आमच्या मते, इतकी तगडी भूमिका आणि इतके तगडे मानधन मिळत असताना हा प्रोजेक्ट नाकारण्याचे करिनाकडे काहीही कारण नाही.एका मुलाची आई झाल्यानंतरही करिनाची लोकप्रियता कायम आहे, हेच यावरून स्पष्ट होते. करिना कपूर बॉलिवूडची एक सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री आहे. तिच्या अदाकारीचे असंख्य चाहते आहेत. आता करिनाला तिच्या जुन्या ग्लॅमरस अंदाजात पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. चाहत्यांची ही प्रतीक्षा कधी संपणार ते लवकरच कळेल. आर. बल्की यांच्या ‘की अ‍ॅण्ड का’ सिनेमात करिना अखेरची दिसली होती.