बॉलिवूडचा दिग्गज निर्माता व दिग्दर्शक करण जोहर सध्या जाम खूश आहे आणि का नसावा? जगप्रसिद्ध मादाम तुसाद संग्रहालयात करणचा मेणाचा पुतळा जो उभारला गेलाय. होय, सिंगापूरच्या मादाम तुसाद संग्रहालयात करणचा मेणाचा पुतळा उभारण्यात आलाय. अलीकडे करणने या पुतळ्याचे अनावरण केले. याचबरोबर, करण जोहर या संग्रहालयात स्थान मिळवणारा बॉलिवूडचा पहिला दिग्दर्शक ठरला.करणच्या मेणाचा पुतळा सेल्फी घेतानाच्या पोजमध्ये आहे. या पुतळ्याचे अनावरण करताना करण कमालीचा भावूक झालेला दिसला. त्याची आई हिरू जोहर ही सुद्धा यावेळी हजर होती. आपल्या पुतळ्यासोबतचे अनेक फोटो करणने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.हा माझ्यासाठी भावूक करणारा क्षण आहे. माझी मुले यश आणि रूही यांना मी हा पुतळा दाखवेल, तेव्हा त्यांच्यासाठीही हा भावूक क्षण असेल. मी ८ वर्षांचा होतो, तेव्हा वडिलांसोबत मादाम तुसाद संग्रहालयाला भेट दिली होती. याठिकाणी एकदिवस माझा मेणाचा पुतळा उभारला जावा, हे माझे स्वप्न होते, आज माझे ते स्वप्न पूर्ण झाले, असे करण यावेळी म्हणाला.
करण जोहरची स्वप्नपूर्ती! मादाम तुसादमध्ये मेणाचा पुतळा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 12:43 IST
सिंगापूरच्या मादाम तुसाद संग्रहालयात करणचा मेणाचा पुतळा उभारण्यात आलाय. अलीकडे करणने या पुतळ्याचे अनावरण केले.
करण जोहरची स्वप्नपूर्ती! मादाम तुसादमध्ये मेणाचा पुतळा!!
ठळक मुद्देकरणने आदित्य चोप्राच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटामध्ये शाहरूख खानच्या मित्राची भूमिका साकारून आपल्या बॉलिवूडमधील कारकिदीर्ची सुरूवात केली