Join us  

पुन्हा एकदा कपिल शर्मा शो रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 4:21 PM

सध्या कपिल शर्मा आपल्या टीमसोबत परदेश दौऱ्यावर असून ठिकठिकाणी फिरून लोकांचे मनोरंजन करत आहे. पण हा दौरा संपताच 'कपिल शर्मा शो' लवकरच छोट्या पडद्यावर परतणार आहे.

कॉमेडियन कपिल शर्माचा ‘कपिल शर्मा शो’  पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला येत आहे. रसिकांना खळखळून हसवण्यासाठी आणि त्यांचं तुफान मनोरंजन करण्याचे काम कपिल या शोच्या माध्यमातून करतो. कपिल शर्मा शो बर्‍याच दिवसांपासून बंद आहे, पण लवकरच हा शो टेलिव्हिजनवर पुनरागमन करणार आहे. जर तुम्हालाही हा शो मनापासून आवडला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी कोणत्याही आनंदाच्या बातमीपेक्षा कमी असू शकत नाही. 

सध्या कपिल शर्मा आपल्या टीमसोबत परदेश दौऱ्यावर असून ठिकठिकाणी फिरून लोकांचे मनोरंजन करत आहे. पण हा दौरा संपताच 'कपिल शर्मा शो' लवकरच छोट्या पडद्यावर परतणार आहे.कॉमेडियन कपिल शर्माचा शो ' कपिल शर्मा शो' अनेक वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे. या शोच्या प्रत्येक सीझनला लोकांनी भरभरून पसंती दिली आहे. मागच्या वेळी जेव्हा हा शो बंद झाला तेव्हा लोकांना याची जराही कल्पना नव्हती. आता रसिकांनाही कपिल शर्मा शो पाहण्याची सवय झाली आहे, त्यामुळे रसिकही हा शो सुरु करावा अशी मागणीच करत होते. चाहत्यांच्या सततच्या मागणीनुसार कपिल शर्मा पुन्हा एकदा त्याचा शो घेऊन येत आहे. येत्या सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हा शो नवीन ढंगात रसिकांच्या भेटीला येणार आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

काही दिवसांपूर्वी कपिल शर्माने त्याचा शो ऑफ एअर केला होता. शो ऑफ एअर घेतल्यानंतर कपिल त्याच्या टीमसोबत यूएस टूरवर गेला होता, जिथे तो लोकांचे मनोरंजन करत आहे. याशिवाय कॅनडातील काही शहरांना भेटी देऊनही तो आपली प्रतिभा दाखवत आहे. लोक वाट पाहत आहेत की कपिल कधी परत येईल आणि छोट्या पडद्यावर रसिकांना विनोदाची मेजवानी मिळणार याकडेच सर्वांचे लक्ष लागणार आहे.

अर्चना पुरन सिंहसुद्धा पुन्हा या शोचा भाग होणार आहे. अनेकदा शोसाठी कलाकरांना मानधन किती मिळते यावरही चर्चा होते. अर्चना एका भागासाठी 10 लाख रूपये घेते. तर कपिल शर्मा एका भागासाठी 50 लाख घेतो. भारती सिंग एका भागासाठी 10 ते 12 लाख व , कृष्णा अभिषेक देखील 10 ते 12 लाख रुपये घेतो.

टॅग्स :कपिल शर्मा अर्चना पूरण सिंग