ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. 25 - 'सैराट'ला मिळालेल्या अफाट य़शानंतर हा चित्रपट आता तेलुगु, कन्नड, तमिळ आणि मल्याळम भाषेत रिमेक होणार आहे. दक्षिणेतील बिग प्रॉडक्शन हाऊस असलेल्या 'रॉकलाईन व्यंकटेश'च्या वतीने या चित्रपटाची निर्मिती होणार आहे. यातील कन्नड चित्रपटातील परशाची भूमिका विक्रम रविचंद्रन हा कलाकार साकारेल. कन्नडमधील नामवंत कलाकार व्ही. रविचंद्रन यांचा तो मुलगा आहे.'सैराट'चे दक्षिणेतील निर्माते रॉकलाईन व्यंकटेश यांच्या मनात तो भरला आहे. तेलुगु भाषेतील रिमेक स्वतः नागराज मंजुळे दिग्दर्शित करणार आहेत. यातील कलाकार अजून निश्चित झालेले नाहीत. पण कन्नड भाषेतील रिमेकमध्ये परशाची भूमिका विक्रम रविचंद्रन साकारणार असल्याचे समजते.विक्रम रविचंद्रन हा २२ वर्षाचा तरुण आहे. त्याने वडीलांच्या कन्नड चित्रपटात छोटीशी भूमिकाही केली होती. आता मोठ्या पडद्यावर त्याला हिरो बनायचे आहे. त्याचे घराणे चित्रपट क्षेत्रातील असल्यामुळे त्याचे संबंध रॉकलाईन व्यंकटेश यांच्याशी आहेत. विक्रम रविचंद्रन याची निवड सैराटच्या रिमेकमध्ये निश्चित असल्याचे सांगण्यात येते.
कन्नड 'सैराट'चा परशा होणार 'विकी'
By admin | Updated: June 25, 2016 06:28 IST