Join us  

कंगनाने राहुल गांधींना पप्पू म्हणत दिलं आव्हान, म्हणाली - 'तर मी राजकारण काय भारत सोडून निघून जाईन...'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 2:26 PM

कंगनाने काँग्रेस नेते राहुल गांधींना 'मोठा पप्पू' आणि काँग्रेस नेते विक्रमादित्य सिंह यांना 'छोटा पप्पू' असं म्हणतं टीका केली आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रानौत लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. कंगना ही हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहे. भाजपने तिला तिकीट दिलं आहे. कंगनाने जोरदार प्रचारही सुरू केला असून या प्रचारा दरम्यान बिनधास्त विधानेही करत आहे. त्यामुळे कंगना वाद ओढून घेतानाही दिसत आहे. कंगनाने काँग्रेस नेते राहुल गांधींना पप्पू आणि काँग्रेस नेते विक्रमादित्य सिंह यांना 'छोटा पप्पू' असं म्हणतं टीका केली आहे.

कंगनानं गुरुवारी प्रचार सभा घेतली. यावेळी तिनं विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. ती म्हणाली, 'एक मोठा पप्पू (राहुल गांधी )दिल्लीत बसला आहे आणि आपल्याकडे एक छोटा पप्पू (विक्रमादित्य सिंह) आहे. मी गोमांस खाते, असा दावा करण्यात आला आहे. मी गोमांस खातानाचा व्हिडीओ त्यांच्याकडे असेल तर त्यांनी तो दाखवावा. पण, ते अस करु शकत नाही, कारण, छोटा पप्पू खोटारडा आहे. छोटा पप्पूकडून आपण काही आशा कशी ठेवू शकतो. जेव्हा त्याचा 'दिल्लीतला मोठा पप्पू (राहुल गांधी) हा शक्तिचा विनाश करायचा आहे असं म्हणतो'. 

पुढे ती म्हणाली, 'छोटा पप्पू मला अपवित्र म्हणतोय. माझ्यावर टीका केली जाते की मी देवभूमीत जायला पाहिजे. मला का अपवित्र, कलंकित ठरवलं जातं आहे. आई-वडिलांच्या मदतीशिवाय मी चित्रपटसृष्टीत नाव कमावले आहे. आता मला राजकारणात उतरून जनतेची सेवा करायची आहे. केंद्रात आणि राज्यात किती महिला मंत्री आहेत? जर मी तुमच्या मनालीची मुलगी राजकारणात अस्तित्व शोधतं आहे तर यांना मिरची का लागतेय? एकीकडे घाणेरडी विचारधारा असलेले पुरुष आहेत. दुसरीकडे नरेंद्र मोदी आहेत. ज्यांनी महिलांनी राजकारणात यावं म्हणून ३३ टक्के आरक्षण दिलं आहे'.

कंगना पुढे म्हणाली, 'मला घाबरवणाऱ्यांना धमक्या देणाऱ्यांना माझं खुल आव्हानं आहे की, हे तुमच्या वडिलांचे आणि आजोबांचं राज्य नाही. हा नरेंद्र मोदींचा नवा भारत आहे. ते मला ढिंकचॅक करते असं म्हणतात. तर त्यांना माझं आव्हान आहे की, माझ्या चित्रपटाचा एकही सीन यशस्वीपणे करू शकला. तर मी राजकारण आणि देश सोडेन. आपण कलेला निवडत नसतो तर कला आपल्याला निवडत असते. कला ही देवी आहे, हे बोलणाऱ्यांनी लक्षात ठेवावं'.

टॅग्स :कंगना राणौतसेलिब्रिटीबॉलिवूड