Join us
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता? आता कंगना राणौत उभारणार भव्य मंदिर, केले ट्विट

By रूपाली मुधोळकर | Updated: December 10, 2020 14:17 IST

कंगनाने एक ट्विट केले आणि तिच्या या ट्विटने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

कंगना राणौत म्हणजे बॉलिवूडची परखड अभिनेत्री. मनाला वाट्टेल ते बोलणारी. या स्वभावामुळे गेल्या काही महिन्यांपासून ती सतत या ना त्या कारणाने चर्चेत आहे. मुद्दा कोणताही असो कंगना बोलणार म्हणजे बोलणार. आता या कंगनाने एक वेगळीच इच्छा प्रकट केली आहे. होय, दुर्गा देवीचे भव्य मंदिर बनवण्याची इच्छा तिने व्यक्त केली आहे.कंगनाने यासंदर्भात एक ट्विट केले आणि तिच्या या ट्विटने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. आपल्या ट्विटसोबत तिने तिच्या कुलदैवताच्या मंदिराचा फोटोही शेअर केला आहे. यात ती हात जोडून उभी आहे.

माता दुर्गेने मला मंदिर बनवण्यासाठी निवडले...

माता दुर्गेने मला भव्य मंदिर बनवण्यासाठी निवडले आहे. जे आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी उभारले होते. माता दुर्गा इतकी कृपाळू आहे की, तिने हे घरही स्वीकारले. पण मला एकदिवस असे मंदिर बनवायचे आहे, जी तिची किर्ती आणि आपल्या महान संस्कृतीच्या तोडीचे असेन. जय माता दी, असे ट्विट कंगनाने केले आहे.

बंदा इतना अंधा भी....! कंगना राणौतवर भडकला दिलजीत दोसांज

ए भाई, ई कंगना के कुछ न बुझाई!  भोजपुरी स्टार खेसारी लाल यादवच्या टीकेने कंगनाची सटकली

शेतकरी आंदोलनामुळे चर्चेतगेल्या काही दिवसांपासून कंगना शेतकरी आंदोलनावर केलेल्या ट्विटमुळे चर्चेत आहे.   वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहणा-या कंगना राणौतने दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली होती. या आंदोलनात सहभागी झालेल्या पंजाबच्या  एका वयोवृद्ध महिलेची खिल्ली उडवणारे  ट्वीट तिने केले  होते. काही वेळानंतर हे ट्वीट डिलीटही केले. पण तोपर्यंत या  ट्वीटचे स्क्रिनशॉट्स व्हायरल झाले होते. यावरून कंगना जबरदस्त ट्रोल झाली होती.  सिंगर व अभिनेता दिलजीत दोसांजने कंगनाच्या या  ट्वीटवर सणसणीत प्रतिक्रिया दिली  होती. ‘बंदा इतना भी अंधा नहीं होना चाहिए,’अशा शब्दांत दिलजीतने तिचा समाचार घेतला होता. अभिनेता दिलजीत दोसांज व तिच्यात जुंपली होती.वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर कंगना सध्या ‘थलायवी’ या सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. सिनेमाचे शूटींग जवळपास पूर्ण झाले आहे. हे शूटींग संपताच ती ‘धाकड’ या सिनेमात बिझी होणार आहे.

टॅग्स :कंगना राणौत