Join us  

कंगनाच्या 'इमर्जन्सी'मध्ये सतीश कौशिक यांची एंट्री, साकारणार 'ही' प्रसिद्ध भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 4:11 PM

कंगना चित्रपटात इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत

Kangana Ranaut Movie Emergency: कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' या चित्रपटाची पहिल्या दिवसापासूनच चर्चा आहे. या चित्रपटातील कंगनाचा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा लूक खूपच चर्चिला गेला. त्यानंतर चित्रपटातील एक-एक भूमिका आणि अभिनेत्याची ओळख करून देण्याचा सिलसिला सुरु आहे. तशातच आज, ज्येष्ठ अभिनेते सतीश कौशिक यांचेही नाव जोडले गेले आहे. सतीश कौशिक हे ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात जगजीवन राम या 'विकासाचा मसिहा' म्हटल्या जाणाऱ्या राजकारण्याची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटातील सतीश कौशिक यांचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. जगजीवन राम हे माजी संरक्षण मंत्री होते आणि स्वातंत्र्यसैनिकही होते. त्यामुळे या चित्रपटात सतीश कौशिक यांना जगजीवन रामच्या भूमिकेत पाहिल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे.

कंगनाने 'इमर्जन्सी'मधील सतीश कौशिक यांचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. चित्रपटातील सतीश कौशिक यांचा फर्स्ट लूक तिच्या इंस्टाग्रामवर रिलीझ करताना, कंगना रणौतने लिहिले- तुमच्यासमोर सादर करत आहे आपत्कालीन काळातला प्रतिभावान चेहरा, सतीश कौशिक यांना जगजीवन राम यांच्या भूमिकेत. ते बाबूजी म्हणून प्रसिद्ध होते. भारतीय राजकीय इतिहासातील ते प्रशंसनीय राजकारणी होते. केवळ अभिनेत्री कंगनाच नाही तर सतीश कौशिक यांनीही त्यांचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. हे शेअर करताना सतीश कौशिक यांनी लिहिले- कंगना राणौत दिग्दर्शित इमर्जन्सी मध्ये जगजीवन राम, ज्यांना सामाजिक न्याय विभागातील प्रसिद्ध व्यक्ती म्हणून ओळखले जाते, त्यांची भूमिका साकारण्याचा मला सन्मान वाटतो.

हे स्टार्सही चित्रपटात साकारणार महत्त्वाच्या भूमिका

सतीश कौशिक यांच्या आधी कंगनाने चित्रपटातील अनेक बॉलिवूड स्टार्सचे फर्स्ट लूक रिलीज केले आहेत. या चित्रपटात अभिनेता श्रेयस तळपदे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणार आहे. अनुपम खेर जयप्रकाश नारायण यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय महिमा चौधरी पुपुल जयकर, मिलिंद सोमण फील्ड मार्शल सॅम माणेकशॉच्या यांच्या भूमिकेत इमर्जन्सी चित्रपटात दिसणार आहेत.

टॅग्स :बॉलिवूडकंगना राणौतमिलिंद सोमण अनुपम खेर