Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंगनाने भावाच्या लग्नात खर्च केले इतके कोटी रुपये, आकडा पाहून उडेल तुमची झोप

By गीतांजली | Updated: November 13, 2020 19:50 IST

कंगनाने आपल्या भावाचे लग्न शाही बनविण्यासाठी कोणतीच कसर सोडली नाही.

अभिनेत्री कंगना राणौतचा भाऊ अक्षतचा विवाह गुरुवारीचा उदयपूरच्या द लीला पॅलेसमध्ये राजेशाही थाटात रितू सागवानसोबत पार पडला. सोशल मीडियावर या लग्नाचे फोटो आणि फोटो जोरदार व्हायरल झाले. कंगनाने आपल्या भावाचे लग्न खास बनविण्यासाठी कोणतीच कसर सोडली नाही. दैनिका भास्करच्या रिपोर्टनुसार अभिनेत्रीने भावाच्या लग्नात जवळपास 6 कोटी रुपये खर्च केले आहेत. याचा अंदाज आपल्याला फोटो पाहून येतोच.

 दैनिक भास्करला कंगनाच्या नातेवाईकांनी सांगितले की, कंगनाने तिच्या भावाच्या लग्नात परिधान केलेल्या लहंगा घातला होता. त्याची किंमत सुमारे १८ लाख रुपये होती. तिचा लेहंगा तयार करायला १४ महिन्याचा कालावधी लागला. लेहंगा बरोबर कंगनाने  ४५ लाखांची दागिने परिधान केले होते. हे दागिने प्रसिद्ध डिझायनर सब्यसाची यांनी डिझाइन केले होते. कंगनाच्या मागणीवरुन उदयपूरमधील हॉटेल लीला पॅलेस राजवाडी थीमवर सजविण्यात आले.

केवळ ४५ पाहुण्यांचा समावेशकोरोनामुळे उदयपूरमधील लीला पॅलेस येथे झालेल्या या लग्नात सोहळ्यात केवळ कंगना व तिच्या कुटुंबातील ४५ जण उपस्थित होते. संपूर्ण लग्न राजस्थानी थीमवर होते आणि पाहुण्यांसाठी राजस्थानी डिश तयार केल्या गेल्या होत्या.  विवाह सोहळ्यादरम्यान राजस्थानी संगीत कलाकारांनी सादर केले. लग्नाच्या आधी संगीत सेरेमनी होती. त्यावेळी कंगना राणौतने फिल्मी गाण्यावर परफॉर्मन्स दिला. इतकेच नाही तर संगीत सेरेमनीमध्ये प्रसिद्ध लोकगीत केसरिया बालम आवों नी, पधारो म्हारे देश या गाण्यावरदेखील कंगनाच्या कुटुंबातील सदस्यांनी ठुमके लगावले.

टॅग्स :कंगना राणौत