Join us  

पाणीपुरी खाण्याच्या नादात काम्या पंजाबी दुकानात विसरली १ लाख, मग घडलं असं काही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 12:01 PM

काम्याने सांगितले की, ती रविवारी एका कार्यक्रमासाठी इंदोरला गेली होती.

जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी एखादी गोष्ट विसरता तेव्हा तुम्हाला ती गोष्ट परत मिळेल अशी आशा नसते. आणि त्यात जर काही मौल्यवान वस्तू असेल तर ती परत मिळण्याची शक्यता खूप कमी होते. पम जर ती वस्तू तुम्हाला परत मिळाली तर तुम्ही भाग्यवान असता. असंच काहीसं घडलंय टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबीसोबत. अभिनेत्री नुकतीच पिकनिकसाठी इंदोरला पोहोचली, जिथे ती एका स्टॉलवर  एक लाख रुपय असलेला लिफाफा विसरली.

काम्याने स्वतः याबाबत माहिती दिली. काम्याने सांगितले की, ती रविवारी एका कार्यक्रमासाठी इंदोरमध्ये होती. दिग्दर्शक मित्र संतोष गुप्ता यांनी तिला प्रसिद्ध पाणीपुरी वाले छप्पनबद्दल सांगितले. इंदोर हे चाट पकोडांसाठी प्रसिद्ध शहर आहे. काम्यानेही छप्पनमध्ये जाऊन पाणीपुरी खाण्याचा निर्णय घेतला. काम्याने सांगितले की, माझ्याकडे एक लाख रुपयांचा लिफाफा होता जो मी काउंटरवर बाजूला ठेवला होता. पाणीपुरी खाण्यात आणि फोटो काढण्यात आम्ही इतके मग्न झालो की तिथला लिफाफा विसरून हॉटेलवर परत आलो.

अभिनेत्रीला पैसे मिळाले परत अभिनेत्री हॉटेलमध्ये पोहोचली तेव्हा तिला आठवले की तिचा एक लाखांचा रोख लिफाफा गायब आहे आणि ती पाणीपुरीच्या दुकानातच विसरली होती. माझा मॅनेजर परत त्या दुकानात गेले, मी टेन्शनमध्ये होतो आणि मला माझे पैसे परत मिळतील की  या आशेवर होते कारण ती ती जागा खूप गर्दीची होती. माझे मॅनेजर तिथे पोहोचले तेव्हा त्यांना माझे पॅकेट मी जिथे ठेवले होते तिथे सापडले, त्यांनी पाणीपुरी स्टॉलचे मालक दिनेश गुर्जर यांच्याशी बोलून ते परत घेतले. काम्या पुढे म्हणाली, मला वाटते की इंदोरचे लोक खरोखर छान आणि दयाळू आहेत. काम्या शेवटची टेलिव्हिजनवर शक्ती-अस्तित्व के एहसास की मध्ये दिसली होती.

 

टॅग्स :काम्या पंजाबी