Join us  

अभिनेता KRKच्या अडचणीत वाढ, 14 दिवसांसाठी तुरुंगात रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 4:25 PM

अभिनेता कमाल आर खानच्या अडचणी चांगल्याच वाढताना दिसतायेत. एका वादग्रस्त ट्विटमुळे त्याच्याविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल आर खानच्या अडचणी वाढत होताना दिसते आहे. वादग्रस्त ट्विट केआरकेला चांगलंच महागात पडलं आहे. केआरकेला मंगळवारी सकाळी मालाड पोलिसांनी एअरपोर्टवरून अटक केली. आता या संदर्भात एक नवीन अपडेट समोर आले आहे.

KRK ला तुरुंगात पाठवण्यात आलेल्या नवीन माहितीनुसार, कमाल आर खानला बोरिवली कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. केआरकेच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. त्याला आता 14 दिवस तुरुंगात राहावे लागणार आहे.

न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर कमाल आर खानला जामीन अर्ज दाखल केला आहे. बोरिवली कोर्टातच दुपारी चार वाजता जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. आता केआरकेला जामीन मिळणार की त्याला १४ दिवस तुरुंगात राहावे लागणार, हे न्यायालयाच्या सुनावणीनंतरच कळेल.

काय आहे प्रकरण?कमाल आर खान याला २०२० मध्ये नोंद झालेल्या एका गुन्ह्यामध्ये ही अटक करण्यात आली आहे. कमाल खानने सोशल मीडियावरून धर्माबाबत वादग्रस्त ट्विट केल्याच्या त्याच्यावर आरोप आहे. 

टॅग्स :कमाल आर खानबॉलिवूड