Join us  

Video: पब्लिक प्लेसमध्ये काजोल व तनीषामध्ये सुरू झालं भांडण, आई तनुजाला करावी लागली मध्यस्थी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 11:50 AM

kajol Tanisha Mukharjee argument at durga puja : काजोल  तशी हसतमुख अभिनेत्री. पण बाईसाहेबांचा पाराही तेवढाच लवकर चढतो. नुकताच काजोल अगदी पब्लिक प्लेसमध्ये भांडताना दिसली.

ठळक मुद्दे काजोलच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर लवकरच ती राजकुमार हिरानींच्या एका चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा आहे. अर्थात अद्याप या चित्रपटाची घोषणा झालेली नाही.

काजोल (Kajol) तशी हसतमुख अभिनेत्री. पण बाईसाहेबांचा पाराही तेवढाच लवकर चढतो. नुकताच काजोल अगदी पब्लिक प्लेसमध्ये भांडताना दिसली. होय, ती सुद्धा लहान बहीण तनीषा मुखर्जीसोबत (Tanisha Mukharjee).  दोघी बहिणी सर्वांसमोर भांडताहेत, पाहून त्यांची आई तनुजा (Tanuja) यांना मध्यस्थी करावी लागली. सोशल मीडियावर याचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय.तर व्हिडीओ आहे दुर्गापूजेदरम्यानचा. दुर्गापूजेला काजोल बहीण तनीषा व आई तनुजासोबत पोहोचली होती. पण का कुणास ठाऊक, दुर्गा देवीच्या पूजा मंडपातच काजोल व तनीषा यांच्यात वाद सुरू झाला. दोघीही एकमेकींसोबत तावातावाने बोलताना दिसल्या. व्हिडीओत काजोल तनीषाकडे पाहून वेडावाकडा चेहरा करते. इतकंच नाही तर तनीषा ऐकण्याच्या मूडमध्ये नाही असं दिसताच तिला चक्क ‘शटअप’ म्हणते. यावर तनीषा काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करते. पण तेव्हाच तनुजा मध्यस्थी करतात आणि तनीषाला गप्प बसवतात. नंतर काजोलही गप्प बसते. यानंतर काय तर तिघीही कॅमे-याला हसत हसत पोज देताना दिसतात.

 याआधी काजोलचा दुर्गापूजेदरम्यानचाच व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात काजोल भावुक होत रडताना दिसली होती. दीर्घकाळानंतर काकांना भेटून काजोल भावुक होते आणि तिला अश्रू अनावर होतात, असा तिचा हा व्हिडीओही चांगलाच व्हायरल झाला होता. काजोलच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर लवकरच ती राजकुमार हिरानींच्या एका चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा आहे. अर्थात अद्याप या चित्रपटाची घोषणा झालेली नाही.

टॅग्स :काजोल